बँकांच्या संपामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प; सलग चार दिवस बँक बंद असल्याने ग्राहक हैराण

सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याच्या मुद्द्याला विरोध करण्यासाठी या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दोनदिवसाचा संप पुकारला आहे. आधीच शनिवार व रविवारी बॅंक बंद राहिल्याने नागरिकांचे कामे खोळंबली आणि दैनंदिन व्यवहार सुद्धा ठप्प झाले.

    वर्धा (Wardha).  सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याच्या मुद्द्याला विरोध करण्यासाठी या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दोनदिवसाचा संप पुकारला आहे. आधीच शनिवार व रविवारी बॅंक बंद राहिल्याने नागरिकांचे कामे खोळंबली आणि दैनंदिन व्यवहार सुद्धा ठप्प झाले.

    सोमवार व मंगळवार हे दोन दिवस बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी कर्मचारी संघटनांनी संपाची हाक दिली आहे.युनायटेड फोरम ऑफ बँकिंग यूनियनने हा संप पुकारला आहे.या यूनियनमध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या 9 संघटना सहभागी आहेत. यामध्ये महाराष्ट्र बँक, स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक, कॅनरा बँक, कार्पोरेशन बँकसह राष्ट्रीयकृत बँकाचा समावेश आहे. शनिवार रविवार दोन दिवस बँक बंद असल्याने आज आणि ग्राहकांनी बँकेमध्ये गर्दी केली होती.

    संपाबाबत ग्राहकांना आधीच माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांचा जर संप होईल तर त्याचा बँकेच्या कामकाजांवर परिणाम होईल. बँकेच्या प्रत्येक शाखेतील कामकाजावर त्याचा प्रभाव पडेल, असं ग्राहकांना आधीच सूचित करण्यात आलं आहे.ज्यांना बँका बंद आहे याची कल्पना नाही त्यांना मात्र आल्या पावली परत जावे लागले.

    संप कशासाठी ?
    बँकांचे खाजगीकरण होत असल्याने कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांना सुद्धा याचा मोठा फटका बसू शकतो. छोटे व्यापारी ,छोटे कर्जदार, शेतकरी यांना राष्ट्रीयकृत बँकेतून सेवा दिल्या जातात.या सेवा खाजगी बँकेतून मिळणार नाही. याच कारणाने या बँकेतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याचे स्थानिक कर्मचाऱ्यांनी सांगितले.

    सरकारी योजना राष्ट्रीयकृत बँकां राबवतात
    सरकारच्या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय कृत बँकेच्या माध्यमातून सेवा दिल्या जातात. खाजगीकरण केल्यास सर्वसामान्यांना त्रासदायक ठरणार आहे. खाजगी बँकेतून जनतेला सेवा पुरवल्या जाणार नाही.

    ॲडव्हान्स टॅक्स मुदत १५ मार्च पर्यंत
    दहा हजारापेक्षा जास्त टॅक्स भरणाऱ्यांना ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. आयकर विभागाने त्यासाठी 15 मार्च शेवटची तारीख होती. शनिवार रविवार दोन दिवस बँका बंद असल्याने ऍडव्हान्स टॅक्स भरता आला नाही. दोन दिवसाच्या संपाने पुन्हा अडचणी निर्माण झाल्या.

    चेक क्लिअरिंग थांबले
    अगोदरच दोन दिवस बँका बंद होत्या. दोन दिवसाच्या संपामुळे दैनंदिन व्यवहार रखडले. चेक क्लिअरिंग थांबल्यामुळे फार अडचणी निर्माण झाल्या आहे. — मुरली केला, व्यवसायिक