बीट जमादाराचा आत्महत्येचा प्रयत्न

 कारंजा (घा.). येथील पोलिस स्टेशनचे वादग्रस्त बीटचे जमादारांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना 30 ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजताचे दरम्यान घडली. विनोद वानखडे असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या बीट जमादाराचे नाव आहे.

कारंजा घाडगे पोलिस ठाण्यात ठाणेगाव बीट सांभाळणारे विनोद वानखेडे यांनी दुपारचे दरम्यान घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरगुती वादामुळे त्यांनी विषारी औषध प्राशन केले. असे बयाणात नमूद करण्यात आले. त्यांचा प्राथमिक उपचार ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे सुरू आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.