प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

घरासमोर विटा ठेवण्यावरून मारहाण केल्या प्रकरणी एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सुजातपूर येथे 6 डिसेंबर रोजी घडली. मधुकर ठाकरे (67) यांच्या तक्रारीवरून सुनील ठाकरे, नंदा ठाकरे, ऋषीकेश ठाकरे, कुणाल ठाकरे यांच्या विरोधात तर नंदा ठाकरे यांच्या तक्रारीवरून मधुकर ठाकरे, मनोहर ठाकरे, रोशन ठाकरे, विकास ठाकरे यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव (Talegaon). घरासमोर विटा ठेवण्यावरून मारहाण केल्या प्रकरणी एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सुजातपूर येथे 6 डिसेंबर रोजी घडली. मधुकर ठाकरे (67) यांच्या तक्रारीवरून सुनील ठाकरे, नंदा ठाकरे, ऋषीकेश ठाकरे, कुणाल ठाकरे यांच्या विरोधात तर नंदा ठाकरे यांच्या तक्रारीवरून मधुकर ठाकरे, मनोहर ठाकरे, रोशन ठाकरे, विकास ठाकरे यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मधुकर ठाकरे हे घराजवळ उभे असताना त्याच्या घराच्या पिल्लरवर विटा ठेऊन असल्याचे त्याला आढळले. यामुळे संतापलेल्या सुनीलने त्या विटा फेकून दिल्या. संदर्भात फिर्यादीने त्यास विचारणा केली असता माझे जागेत विटा का ठेवल्या या कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. यानंतर सुनील ठाकरे, ऋुषीकेश ठाकरे, नंदा ठाकरे व कुणाल ठाकरे यांनी मधुकर ठाकरे यांना मारहाण करून जखमी केले. तर मधुकर ठाकरे मनोहर ठाकरे, रोशन ठाकरे व विकास ठाकरे यांनी वाद करीत मारहाण केली.असे नंदा ठाकरे यांनी दाखले केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दोनही प्रकरणी एकमेकांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजेश शाहू करीत आहे.