प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

हिंगणघाट (Hinganghat): इंडियन प्रीमियर लिग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवर सट्टा बाजार जोमात सुरू आहे; परंतु आतापर्यत एकाही सट्टा बुकींवर कारवाई करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांच्या आशिर्वादाने हा सट्टा बाजार सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आयपीएल क्रिकेट सामने सुरू होऊन 45 दिवस झाले आहेत. दररोज कोटयवधी रूपयांचा सट्टा लावण्यात येत आहे. शहरातील एका मोठया पोलिस अधिका-यांच्या आशिर्वादाने हा सट्टा खेळल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील काही सट्टा बुकींनी नागपुरात शाखा उघडल्याची माहिती आहे. ऑनलाईन बँकींगवर ऑनलाईन सट्टा लावण्यात येत आहे. नागपूर येथील एका फ्लॅटवर पोलिसांनी कारवाई करीत काही सट्टा बुकी व सट्टा लावणा-यांना पकडले. यातील काही जण हिंगणघाट येथील आहे. परंतु, नागपूर पोलिसांनी मोठया आरोपींना पडदयाचे मागेच ठेवले आहे. गुन्हे शाखेने योग्य पध्दतीने कारवाई केली असती तर अनेक व्हॉईट कॉलर आरोपी समोर आले असते. परंतु, सट्टा व्यवसायिकांवर कारवाई करण्यासाठी पोलिस समोर येतांना दिसून येत नाही. याकडे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.