टोल नाक्यावरील खड्डे देताहेत अपघातास निमंत्रण

नागपूर-तुळजापूर महामार्गवरील हुसनापूर टोलनाक्यावर सुविधांचा अभाव दिसून येतो. नाक्याजवळील डांबरी रस्त्यावार मोठमोठे खड्डे पडले आहे. रस्त्यावरील खड्डे अपघातास निमंत्रण देत आहे.

    भिडी (Bhidi). नागपूर-तुळजापूर महामार्गवरील हुसनापूर टोलनाक्यावर सुविधांचा अभाव दिसून येतो. नाक्याजवळील डांबरी रस्त्यावार मोठमोठे खड्डे पडले आहे. रस्त्यावरील खड्डे अपघातास निमंत्रण देत आहे. परंतु याकडे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

    नागपूर-तुळजापूर महामार्गावर हुसनापूर टोलवसुली नाका आहे. टोल नाक्याच्या दुतर्फा डांबरी रस्ते तयार करण्यात आले आहे. सोबतच दुभाजक लावण्यात आले आहे. या मार्गावरून वाहनाची वर्दळ मोठी असते. रस्त्याची दुरवस्था झाली असुन मार्गावर मोठमोठाले खड्डे पडले आहे. चालकाचे खड्डा चुकविताना वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडून येत आहे. दररोज किरकोळ घटना घडून येत आहे.

    फलकाचा अभाव
    रस्त्यावर मार्गदर्शक फलकाचा अभाव दिसून येत आहे. टोलनाक्यावरून आवागमन करण्याकरिता एक मीटरचा रस्ता तयार करण्यात आला. परंतु या रस्त्यावर मार्गदर्शक फलक लावण्यात आले नाही. यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज येत नाही. परिणामी रस्त्याची दुरुस्ती तसेच दिशादर्शके फलक लावण्याची मागणी नागरिक करीत आहे.