प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

वर्धा (Wardha).  नदीपात्रात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. ही घटना सोमवारी सायंकाळी कवडघाट नदी काठावर समोर आली. माहितीनुसार निशानपूरा येथील अब्दुल अमीन अब्दुल मोबीन (३४) हा मित्रांसह कवडघाट येथे गेला होता. दरम्यान उडीसा राज्यातील काही नागरिक नदी पार करीत असतांना खैरे यांचे शेताला लागून असलेल्या नदीकाठावर मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती अब्दुलला दिली.

अब्दुल व त्याचा मित्र घटनास्थळी गेले असता मृतदेह तरंगतांना आढळून आला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आला. मृतकाची ओळख पटली नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.