प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

साहूर (Sahur) :  नजीकच्या पोरगव्हाण येथील शेतक-याने कर्जाचे जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना वर्धा जिल्ह्यातील साहूर येथे सोमवारी उघडकीस आली. महादेव नथ्थुजी काकडे (68) असे मृत शेतक-याचे नाव आहे.

मृतक महादेव नथ्थुजी काकडे यांचेकडे मौजा पंचाळा येथे साडेनऊ एकर शेती आहे. त्यांनी बँक आँफ इंडीया आष्टी बँकेकडून 2 दोन लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. परंतु, शासनाकडून अनेक वर्षांपासुनचे कर्ज माफ झाले नाही. यामुळे ते गेल्या अनेक दिवसांपासून विवंचनेत राहत होते. ते शेतात गेले असता कालपासून घरी आले नाही. याकरीता घरातील मंडळींनी सगळीकडे शोधाशोध केली. मात्र ते कुठेही दिसून आले नाही. काकडे यांच्या शेतातील विहिरीतच सोमवारी दुपारी त्यांचे प्रेत आढळून आले. पोलिसांनी पंचानामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आर्वी येथे पाठविला. पोलीस या घटनेचा तपास करीत आहे.