प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

वर्धा जिल्ह्यातील कारंजा(घाडगे ) तालुक्यातील रहाटी व कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात 2 जणांचे मृतदेह मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतकांमध्ये लिंगप्पा हिंगमिरे (45) व रवींद्र रमेश वंजारी (35) यांचा समावेश आहे. 

कारंजा(घाडगे ).  वर्धा जिल्ह्यातील कारंजा(घाडगे ) तालुक्यातील रहाटी व कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात 2 जणांचे मृतदेह मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतकांमध्ये लिंगप्पा हिंगमिरे (45) व रवींद्र रमेश वंजारी (35) यांचा समावेश आहे.

रहाटी येथील लिंगप्पा हिंगमिरे १७ नोव्हेंबरला बेपत्ता झाले. पती बेपत्ता असल्याची पत्नी चंद्रकला हिंगमिरे यांनी तक्रार केली हेाती. अशातच २० नोव्हेंबर रोजी शाम विनोद भागानागरे याला गाव परिसरातील विहिरीमध्ये लिंगप्पाचा मृतदेह दिसून आला. याबाबतची सुचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्ततरीय तपासणीकरिता पाठविण्यात आला. लिंगप्पाने आत्महत्या केल्याची घटना जरी उघडकीस आली असली तरी आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

तर दुसरीकडे शनिवारी सकाळी ६.१५ वाजता दरम्यान खैरी (पुनर्वसन)येथील रवींद्र रमेश वंजारी (३५) यांचा मृतदेह बाजार समिती परिसरात मिळाला. ही बाब समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचून पंचनामा करण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहे.