सेलू तालुक्यातील अपघातात जखमी झालेला वृद्ध
सेलू तालुक्यातील अपघातात जखमी झालेला वृद्ध

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघे जण जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान दंडारे यांचे शेत परिससरात घडली. राजू रामाजी लाखे (57) व उमेश उर्फ बाबाराव रामाजी गायकवाड (52) अशी जखमींची नावे आहेत.

सेलू (Selu).  वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघे जण जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान दंडारे यांचे शेत परिससरात घडली. राजू रामाजी लाखे (57) व उमेश उर्फ बाबाराव रामाजी गायकवाड (52) अशी जखमींची नावे आहेत.

माहिती नुसार, शनिवारी सकाळी राजू लाखे व उमेश गायकवाड केळझर येथून एमएच 29 बीसी 3046 क्रमांकाच्या दुचाकीने सेलू येथे सेंद्रीय शेतीच्या बैठकीसाठी येत होते. शहरात येणा-या मार्गाकडे वळताच मागून आलेल्या अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर कारचालक वाहन घेऊन पसार झाला. याप्रकरणी सेलू पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सेलू पोलिस करीत आहे.