Businessmen in Wardha prepare for public curfew
संचारबंदीचा प्रतीकात्मक फोटो

  • चार दिवसाचा कर्फ्यु
  • प्रशासन समन्वयकाच्या भूमिकेत

वर्धा (Wardha).  जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत रोज झपाट्याने वाढ होत आहे. ही साखळी तोडण्यासाठी शहरातील व्यापा-यांनीच बाजारपेठ बंद ठेवुन जनता कर्फ्युची तयारी दर्शवली असल्याने प्रशासनाने सहकार्याच्या हेतुने समन्वयकाची भूमिका घेतली आहे. बंदला अनेकांचा खो सुद्धा आहे. तर, हा बंद अनेकांचा रोजगार हिरावणारा आहे. यामुळे हातावर आणणे आणि पानावर खाणा-यांची गोची होणार असल्या बंद पाळण्यात येवु नये, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

जिल्यात १० मे ला पहिला कोवीडचा रुग्ण आढळला होता. हा आकडा रोज शेकडोने वाढत आहे. कालपर्यंत अडीच हजाराच्या घरात बाधितांचा आकडा गेला आहे. रविवारी (१३) सांयकाळी शहरातील व्यापा-यांचे शिष्टमंडळ चार दिवसाचा जनता कर्फ्यु करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांना भेटले. या बैठकीला पोलिस उपविभागीय अधिकारी पीयुष जगताप, नगरपरिषदेचे पदाधिकारी व व्यवसायिक उपस्थित होते. या बैठकीत सर्वच व्यवसायीक त्यांचे प्रतिष्ठान १८, १९, २० आणि २१ रोजी बंद ठेवतील, असे एकमताने ठरले. या जनता कर्फ्युला सर्व स्तरावरुन पांठीबा मिळवण्यासाठी आज मंगळवार सर्व पक्षीय बैठक उपविभागीय अधिका-यांच्या दालनात झाली.

यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, राष्ट्रवादीचे सुनील राऊत भाजपचे प्रशांत बुर्ले, अविनाश काकडे, शिवसेनेचे सेनेचे अनिल देवतारे, बाळा शहागडकर, तुषार देवढे, राकेश मंशानी, सुनील पारिसे व इतर पक्षाचे प्रतिनिधींचे उपस्थितील नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदी ठाकूर यांचेसह बैठक झाली. अविनाश काकडे यांनी बंदला विरोध केला. बंद असल्यावर सामान्यजण परिसरातील पर्यटन स्थळावर जावुन गर्दी करतात, असे राकेश मंशानी यांनी सांगितले. मनोज चांदुरकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागात दुकानदार बंद ठेवत नाही. यावर प्रशासनाने स्पष्ट सांगितले की, आम्हाला कुणालाच दुकाने बंद ठेवा म्हणण्याचा अधिकार नाहीं. तुम्ही सुद्धा कुणाला बंद ठेवा, असे म्हणु शकणार नाही. ज्यांना स्वता बंद ठेवायचे आहे. ते स्वयं इच्छेने बंद ठेवतील. त्यामुळे या बंदची सुरवात हो- नाहीत अडकली. परंतु, प्रशासनाने मदतीचा हात देण्याची भूमिका घेतली.

दुपारी पुन्हा शहराच्या परिसराला लागुन असलेल्या ११ ग्रामपंचायतीच्या सरपंचाची बैठक सुद्धा एसडीओच्या दालनात झाली. या बैठकीत सर्वांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याचे पिपंरी मेघेचे सरपंच अजय गौळकार यांनी सांगितले. बैठकीनंतर एसडीओ पुलगावला निघुन गेले. या संचारबंदीसाठी प्रशासन कोणताही आदेश काढणार नाही. यासाठी एक कृतीसमिती गठीत होणार आहे. ती या निर्णयावर बुधवारी १५ ला शिक्कामोर्तब करेल. तर, दुसरीकडे कॉग्रेसने जनता कर्फ्युचा विरोध केला आहे.

आमची फक्त समन्वयाची भूमिका
— जनता कर्फ्यु घेण्याचा अधिकार प्रशासनाला नाही. व्यावसायिक स्वःताच आलेत. आम्ही फक्त समन्वयकाच्या भूमिकेत आहे. जनता कर्फ्यु झाल्यास आम्हाला सर्वे करता येईल. जे मास्क वापरणार नाही. त्यांना दंड आकारणार आहोत, असे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी सांगितले.