हीच ती रस्त्याच्या कडेला पलटलेली कार
हीच ती रस्त्याच्या कडेला पलटलेली कार

  • तीन जण जखमी

समुद्रपुर (Samudrapur). तालुक्यातील हिंगणघाट उमरेड मार्गावरील वडगाव (पाटी) दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात कार अनियंत्रित होऊन पलटी झाली.या अपघात तिन जण किरकोळ जखमी झाले.

प्राप्त माहितीनुसार रविवार १३ सप्टेंबरला वडगाव (पाटी) जवळ वडगाव वरून भरधाव वेगाने येत असलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात गिरड कडून हिंगणघाटच्या दिशेने जात असलेली कार क्रमांक एम. एच. ३२ ए. एन. ५५६५ ही अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली.या अपघात कोणत्याही जिवीतहानी झाली नसली तरी काय मधिल तिन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हिंगणघाट येथिल खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यावेळी कारचालकाच्या समय सुचकतेमुळे दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. या अपघात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातील जखमीचे नाव कडून शकले नाही.