दुकानांच्या वेळेत बदल, पान टपरीसह सर्व व्यवसाय सुरु करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

वर्धा जिल्ह्यातील सर्व दुकाने, बाजारपेठ, वर्कशॉप, मॉल, केस कर्तनालय हे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उघडी रहाण्यास निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता शासनाच्या अधिसुचनेनुसार दुकानांची वेळ सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात आली आहे

वर्धा : कोरोना संक्रमण नियंत्रणाकरिता देशात २३ मार्च पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे लहान- मोठे व्यवसाय ठप्प पडले होते. राज्यात ३ अनलॉकमध्ये काही व्यवसायांना शिथीलता देत जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार व्यवसाय सुरू करण्यात आले होते. मात्र चहा व पानटपरी व्यवसाय ठप्पच होते. हे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून दुकानाच्या वेळत बदल करण्यात आला आहे.  महाराष्ट्र  शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिसुचनेनुसार. राज्यात कोविड -१९ मुळे उद्भवणा-या संसर्गजन्य असाजारामुळे आरोग्यविषयक आपत्तीकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात साथरोग अधिनियमानुसार आपातकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याने लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील सर्व दुकाने, बाजारपेठ, वर्कशॉप, मॉल, केस कर्तनालय हे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उघडी रहाण्यास निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता शासनाच्या अधिसुचनेनुसार दुकानांची वेळ सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात आली आहे

सलूनची दुकाने सकाळी ६ वाजता उघडतील 

कोरोना संक्रमण नियंत्रणाकरिता २३ मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यामध्ये सलून व्यवसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले होते. त्यानंतर काही व्यवसायांमध्ये शिथीलता आणून व्यवसाय सुरू करण्यास मुभा देण्यात आली होती. यामध्ये सलून व्यवसायिकांना दुकान सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र आता शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार दुकानांची वेळ सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात आली आहे.   

 चहा व पानटपरी व्यवसायिकांना दिलासा

कोरोना संक्रमणात चहा, व पानटपरी व्यवसाय  पुर्णत: बंद होते. काही व्यवसायसात शिथिलता आणून दुकाने उघडी करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र हे व्यवसाय ठप्पच होते. आता शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार चहा, व पानटपरी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे. अटी व नियमानुसार चहा टपरी व्यवसायिकांनी  ग्राहकांना चहा देताना डिस्पोजलचा वापर करावा तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे. पान टपरीवर खर्रा विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. चहा व पानटपरीत वापरात  येणा-या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. विक्रेत्यांनी मास्क व हॅन्डग्लोव्हजचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आदेशानुसार दुकाने, बाजारपेठा, वर्कशॉप, मॉल, केस कर्तनालये यांना वगळता उर्वरित व्यवसायांच्या अटी व नियम पुर्वीप्रमाणेच वर्धा जिल्ह्याकरिता लागू राहतील. मात्र आता शासनाचा अध्यादेश जारी करण्यात आला असून दुकानाची वेळ सकाळी ९ ते  सायंकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. ही दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच केस कर्तनालये सकाळी ६ वाजतापासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

दुकानांची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७ 

कोरोना संक्रमणात कोविड -१९ च्या नियंत्रणाकरिता देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र आता जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आला असून दुकानाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. जिल्हयात बंद असलेली तंबाखू,चहा, पानटपरी अटी शर्तीवर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व दुकाने ,बाजारपेठा, मॉल, हे दररोज सकाळी ९ ते ७ वाजेपर्यंत उघडी राहतील. दुध, भाजी विक्री, वृत्तपत्र वितरकांना सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार दुकाने, बाजारपेठा, वर्कशॉप, मॉल, केस कर्तनालये याची  वेळ वगळता उर्वरित व्यवसायांच्या अटी व नियम पुर्वीप्रमाणेच वर्धा जिल्ह्याकरिता लागू राहतील.