प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

जिल्ह्यात काही दिवसांपासून वातावरणात बदल दिसून येत आहे. काही भागात ढगाळी वातावरण कायम आहे. याचा फटका फळबागांवर दिसून येत असून फळ उत्पादक शेतक-यांच्या अडचणीत भर पडली आहे. जिल्हयात संत्रा, मोसंबी, लिंबू, केळी, पपई याचे उत्पादन घेतले जाते. थंडीच्या दिवसातील वातावरणाचा संत्रा, मोसंबी, पपई पिकाला फटका बसत आहे. आर्वी तालुक्यातील हिवरा गावात शंभर हेक्टर संत्रा बागायत आहे. थंडीमुळे डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव संत्रा पिकावर दिसून येत आहे. त्यामुळे संत्राची झाडे मुळासकट पूर्णपणे वाळल्यागत दिसत आहे.

  • संत्रा पिकावर थंडीमुळे डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव

वर्धा (Wardha).  जिल्ह्यात काही दिवसांपासून वातावरणात बदल दिसून येत आहे. काही भागात ढगाळी वातावरण कायम आहे. याचा फटका फळबागांवर दिसून येत असून फळ उत्पादक शेतक-यांच्या अडचणीत भर पडली आहे.
जिल्हयात संत्रा, मोसंबी, लिंबू, केळी, पपई याचे उत्पादन घेतले जाते. थंडीच्या दिवसातील वातावरणाचा संत्रा, मोसंबी, पपई पिकाला फटका बसत आहे. आर्वी तालुक्यातील हिवरा गावात शंभर हेक्टर संत्रा बागायत आहे. थंडीमुळे डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव संत्रा पिकावर दिसून येत आहे. त्यामुळे संत्राची झाडे मुळासकट पूर्णपणे वाळल्यागत दिसत आहे.

आर्वी उपविभागातील कारंजा तालुक्यातील जसापूर येथे थंडीमुळे पपई पिकावर विपरित परिणाम दिसून येत आहेत. पपईच्या झाडांमध्ये अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत आहे. अशातच बुरशी आणि मावाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत आहे. आता वाढत्या थंडीमुळे पुन्हा डिंक्या रोग आहे. डिक्या रोगापासून बचाव करण्यासाठी चुना आणि मोरचुद यांचे मिश्रण करून झाडाला लावावे कृषी विभागाने केले आहे. थंडीमुळे फळगळती होते. तसेच फुलगळतात. आर्वी उपविभागात संत्रा, मोसंबी आणि पपई या पिकांवर याचा परिणाम दिसून येत आहे.

सततच्या रोग प्रार्दुभावामुळे संत्रा उत्पादकांनी लावलेला खर्चही यंदा निघणे कठीण झाले आहे.आंबीया बहराला गळतीयावर्षी आंबिया बहाराचा संत्रा शेतक-यांना विकता आला नाही. या संत्राचा बहार झाडावरूनच गळून पडला.यामुळे संत्रा उत्पादक शेतक- यांचे मोठे नुकसान झाले आहे. पपईवर बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव फळ उत्पादक शेतक-याचे मोठे नुकसान झाले आहे. पपईवर बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. यामुळे जसापूर येथील शेतक-याचे तीन एकरातील पपईचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या अधिका-यांनी योग्य मार्गदर्शन करावे. अशी मागणी शेतकरी करीत आहे.

फळगळ मोठया प्रमाणात
सततच्या पावसामुळे फळगळ झाली. तर सध्या थंडीमुळे डिंक्या, कोळशी आदी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे फळगळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.सहा महिन्यांपासून संत्रा पिकावर तपकीरी रॅाट या रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर फळगळती झाली. त्यामुळे त्यावेळी संत्रा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला. — गौरव ठाकरे, शेतकरी हिवरा (तांडा).