अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून लिपिकाची आत्महत्या; वर्ध्यातली धक्कादायक घटना

ही घटना सफाई कर्मचाऱ्यांना निदर्शनास आली.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी नागरिकांनी नगर पंचायत कार्यालय समोर मोठी गर्दी केली होती.

    वर्धा.  नगर पंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्याने कार्यालयातच फंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या (wardha suicide) केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात समोर आली आहे. याघटने शहरात खळबळ उडाली आहे. अशोक जसुतकर असे  मृतकाच नाव आहे. नगर पंचायत मधील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.  मृतकाच्या खिशात चिठ्ठी मिळाली त्यात ४ जणांचे नाव लिहिले आहे.  यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृतकाची बहीण रंजना टिपले यांनी केली.

    नगर पंचायत कार्यालयाला आज सुट्टी असूनही अशोक जसुतकर हे  १० वाजताच्या सुमारास कार्यलयात आले व त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यलयातच  गळफास घेत आपले जीवन संपविले. ही घटना सफाई कर्मचाऱ्यांना निदर्शनास आली.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी नागरिकांनी नगर पंचायत कार्यालय समोर मोठी गर्दी केली होती. अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. चिठ्ठीत नाव लिहिलेल्या ४ जणावर कारवाई  व्हावी यासाठी पोलिसांकडे मागणी केली जात आहे.