नैसर्गिक आपत्ती बचाव पथकाची रंगीत तालीम; पोलिस विभाग, वनविभागासह वैद्यकीय पथकाचा समावेश

अवेळी येणारी नैसर्गिक आपत्ती (the unforeseen natural calamity) त्यासंबंधाने शासकीय बचावकार्याचा (the government's rescue) एक भाग म्हणून येथील कपिलेश्र्वर तलावावर (Kapileshwar Lake Ashti) विविध कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय रंगीत तालीम करण्यात आली.

  आष्टी शहिद (Ashti Shahid).  अवेळी येणारी नैसर्गिक आपत्ती (the unforeseen natural calamity) त्यासंबंधाने शासकीय बचावकार्याचा (the government’s rescue) एक भाग म्हणून येथील कपिलेश्र्वर तलावावर (Kapileshwar Lake Ashti) विविध कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय रंगीत तालीम करण्यात आली. त्यात आर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे (Sub-Divisional Police Officer Sunil Salunkhe) यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात सपोनि जितेंद्र चांदे यांनी कपिलेश्वर तलाव आष्टी येथे दोन इसम पाण्यात अडकलेले आहे, त्यांचा बचाव म्हणून प्रात्यक्षिक घेण्यात आले.

  सदर प्रात्यक्षिकांमध्ये आष्टी पोलिस ठाणे येथे अचानक 11.05 मिनिटांनी फोन येतो आणि दोन इसम पाण्यात अडकल्याची माहिती मिळते. त्याचवेळी पोलिस उपनिरीक्षक देविदास ठमके आपल्या साहित्यानिशी पथकासह घटनास्थळी 11.25 वाजता दाखल होतात. तसेच पोलिस उपनिरीक्षक देविदास ठमके यांनी मदतकार्यात आष्टी वनपरिक्षेत्र कार्यालयाला मदत मागितली. त्यानंतर तेथून वनपरिक्षेत्र अधिकारी ताबडतोब वनरक्षक प्रकाश देशभ्रतार, किरण काजळे, प्रफुल्ल घोरपडे, हनुमंत मुसळे वनवाहनचालक गजानन शेंद्रे आपल्यावर वाहनात मोठी रस्सी, एलईडी टॉर्च, जाळे घेऊन 11.30 वाजता दाखल होतात. त्यानंतर 11.35 वाजता ग्रामीण रुग्णालय आष्टी येथून डॉ. शृंखला भलावी आपल्या वैद्यकीय चमूसह घटनास्थळी दाखल होतात.

  त्यात लक्ष्मीकांत देशमुख, पंकज चतुर आणि वाहनचालक सुधीर भिसे आपल्या वैद्यकीय साहित्यासह त्यात ऑक्सिजन सिलेंडर, स्टेचर, प्रथमोपचार औषधी साहित्य घेऊन येतात. त्याचप्रमाणे स्थानिक नगर परिषद आष्टीद्वारा अग्निशामकदल पथकप्रमुख कदम पोहचतात. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित कर्मचारी आणि पोहणारे इसम अजय चातुरकर व सत्यनारायण शर्मा यांची मदत घेऊन लाईफ जॅकेट, लाईफ ट्यूब दोरीच्या साहाय्याने पाण्यात अडकलेले आष्टी येथील इसम नामे अजय भोलानाथ राठोड व शुभम तायडे या अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढतात.

  वैद्यकीय पथकाने तपासणी करून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात येते. सदर घटनास्थळावर 11.05 ते 12.15 सदर बचाव पथकाने केलेली कारवाई अत्यंत अल्प कालावधीत एक तास दहा मिनिटात पार पाडून आम्ही बचाव कार्यासाठी तत्पर असल्याचे नागरिकांना दाखवून दिले. तसा रंगीत तालमीचा अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालय वर्धा येथे पाठवण्यात आल्याचे कळविले आहे.

  हिंगणघाट येथे पुरपरिस्थिती हाताळण्याचा सराव
  येणारा पावसाळा लक्षात घेता पुरपरिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने पोलिस तसेच गृहरक्षक दलाच्या सैनिकांसाठी एका सराव शिबिराचे आयोजन स्थानिक वणा नदी परिसरात करण्यात आले. सदर शिबिराचे आयोजन उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्रीराम मुंदड़ा, पोलिस ठाणेदार संपत चव्हाण, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी पाटील, अग्निशमन अधिकारी गिरीश गंडाइत, गृहरक्षक दलाचे तालुका समादेशक रोकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

  25 मे रोजी सकाळी ११ वाजता एकत्र होऊन वणा नदी पात्रात पुरग्रस्त नागरिकांना मदत करीत त्यांना जीवितहानी होण्यापासून वाचवितांनाची रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये 32 पोलिस अंमलदार, 8 अग्निशमन विभाग कर्मचारी तसेच 10 होमगार्ड सैनिक सहभागी झाले.