केंद्र सरकारच्या शेतकरी कायदयाविरोधात काँग्रेसचा आज सेवाग्राम येथे राज्यव्यापी सत्याग्रह

वर्धा. केंद्रातील सरकारने लादलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत. या मागणीकरिता आज ३१ ऑक्टोंबर रोजी काँग्रेसच्या वतीने राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात येणार आहे. माजी प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी यांचा हुतात्मा दिवस व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधुन राज्यभरात किसान अधिकार दिवस पाळला जाणार आहे. या काळया कायदया विरोधात सत्याग्रह करण्यात येत आहे.

सेवाग्राम येथे सत्याग्रहाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेस पक्षातील व मंत्रीमंडळातील सदस्य, आमदार रणजीत कांबळे, महिला प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, माजी आमदार अमर काळे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांची उपस्थिती राहणार आहे.

मोदी सरकारने विरोधी पक्षाची मते विचारात न घेता बहुमताच्या जोरावर कायदे मंजूर केले आहे. हे कायदे मुठभर उद्योगपतींचे हित डोळयासमोर ठेवुन करण्यात आले आहे. यामुळे शेतकरी देशाधडीला लागणार आहे. कायदयाचे माध्यमातून शेतक-यांना उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचा सरकारचा डाव आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी व शेतक-यांचे रक्षण करण्यासाठी हे काळे कायदे रद्द करेपर्यत काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार आहे, अशी माहित कार्यक्रमाचे समन्वयक विशाल चौधरी यांनी दिली आहे.