क्रिकेटवर सट्टा
क्रिकेटवर सट्टा

हिंगणघाट (Hinganghat): क्रिकेट सट्टेबाज व त्याचे जुळलेल्या हवाला व्यवसायिकांवर नागपुरात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी कारवाई केली. यामुळे क्रिकेट सट्टा व्यवसाय करणा-यांमध्ये खळबळ उडाली आहे. नागपुरात ज्यांचेवर कारवाई करण्यात आली, त्यांचे शहरातील सट्टा व्यवसायिकांशी कनेक्शन जुळले आहे, अशी शहरात चर्चा आहे.

क्रिकेट सामन्यांवर नागपूर नंतर हिंगणघाट शहरात मोठया प्रमाणात सट्टा चालविण्यात येतो. दररोज कोटयवधी रूपयांची उलाढाल यात होत आहे. क्रिकेट सामन्यांवर येथे 25 वर्षापासून सट्टा लावण्यात येत आहे. येथील सट्टा व्यवसायिकांवर कारवाई करण्यात आली; परंतु त्यांना शिक्षा झाली नाही. क्रिकेट बुकींच्या फंटरांनी जुगारात हारलेली रक्कम वसूल करण्यासाठी दादा लोकांशी संबंध जोडले आहे. शहरातील दादा मंडळी ही रक्कम वसुल करण्याचे काम करतात. क्रिकेट सट्टयात हारलेली रक्कम देण्यास असमर्थ ठरणा-या अनेक युवकांनी आत्महत्या केली आहे.

करोडपती घरच्या युवकांना क्रिकेट सट्टा लावण्यासाठी प्रलोभन दिले जाते. यात काल रोडपती असलेले सट्टा बुकी करोडपती झाले आहे.  नागपूर येथे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेल्या कारवाईमुळे क्रिकेट सट्टा बाजारात खळबळ उडाली आहे. याचा प्रभाव येथील सट्टा व्यवसायावर झाला आहे. नवनियुक्त पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी या क्रिकेट सट्टा व्यवसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.