महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वर्धा(Wardha).  उमेद प्रकल्पातंर्गत कार्यरत कर्मचा-यांना पुर्ननियुक्ती देण्याचा आदेश काढण्यात आला आहे. सोबतच प्रकल्पाच्या खासगीकरणावर जोर देण्याविरोधात कंत्राटदारांनी एल्गार पुकारला आहे. याकरिता सोमवारी, १२ सप्टेंबर रोजी वर्धा येथे राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व महिला व पुरुष कर्मचारी मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवित आपल्या मागण्या मांडतील.

वर्धा (Wardha).  उमेद प्रकल्पातंर्गत कार्यरत कर्मचा-यांना पुर्ननियुक्ती देण्याचा आदेश काढण्यात आला आहे. सोबतच प्रकल्पाच्या खासगीकरणावर जोर देण्याविरोधात कंत्राटदारांनी एल्गार पुकारला आहे. याकरिता सोमवारी, १२ सप्टेंबर रोजी वर्धा येथे राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व महिला व पुरुष कर्मचारी मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवित आपल्या मागण्या मांडतील.

दुसरीकडे उमेद अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचारी ट्विटर, फेसबुक , सोशल साईटवर मागण्यांबाबत शासनाचे लक्ष केंद्रित करणार आहे. सोमवारी दुपारी १ वाजता बजाज चौरस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्याभरातील शेकडो कर्मचारी सहभागी होतील. १० सप्टेंबर रोजी काढलेला आदेश रद्द करा, कर्मचा-यांना पुर्ननियुक्ती द्या, तसेच खासगीकरणाच्या विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यभरातून ३० हजार पोस्टकार्ड मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाठविण्यात येणार असल्याची माहिती कर्मचा-यांनी दिली.