Corona-Virus-latest-image

वर्धा (Wardha). जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या जरी कमी होत असली तरी मृत्यू होण्याचे प्रमाण कायम आहे. रविवारी नविन कोरोना बाधीत 43 मिळाले असुन तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये वर्धा येथील 30 वर्षिय, समुद्रपूर 65 वर्षिय तसेच सेलू येथील 36 वर्षिय पुरुष आहे.

रविवारी मिळालेल्या बाधितांमध्ये 26 पुरुष व 17 महिलांचा समावेश आहे. वर्धा तालुक्यामध्ये 31 बाधित मिळाले , यामध्ये 17 पुरुष व 14 महिला, देवळी येथील 1 पुरुष, सेलूत 1 पुरुष एक महिला, आर्वीत 1 पुरुष एक महिला, कारंजा येथे 1 पुरुष तसेच हिंगणघाट येथे 5 पुरुष 1 महिला बाधित मिळाले आहे.यामध्ये जिल्ह्यातील बाधितांची संख्या 5हजार 798 वर पोहचली आहे . आज 210 कोरोना मुक्त झाले. कोरोनापासून मुक्त झालेल्यांची संख्या 4हजार 701 वर पोहचली आहे. 912 अॅक्टिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत 44012 जणांचे स्वॅब तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. यामधुन 37649 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असुन 25 जणांचे अहवाल प्रलंबित आहे.