कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, १०६ बाधित

वर्धा (Wardha).  जिल्ह्यात मागील रविवारी १०६ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत. जेव्हा की ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये समुद्रपूर निवासी ५० वर्षीय पुरुष, आष्टी निवासी ६९ वर्षीय पुरुष आणि हिंगणघाट निवासी ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. नवीन कोरोना बाधितांमध्ये ६९ वर्षीय पुरुष आणि ३७ महिलांचा समावेश आहे. वर्धा तहसीलमध्ये सर्वाधिक ६० रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुरुष ३८ आणि महिला २२ आहेत.

देवळी तहसीलमधील ७ रुग्णांमध्ये ६ पुरुष आणि १ महिला आहे. सेलूत १२ रुग्णांमध्ये पुरुष ६ आणि ६ महिला आहेत. आर्वीत ५, कारंजा तहसीलमध्ये १ पुरुष, हिंगणघाटमध्ये १६ रुग्ण असून यामध्ये पुरुष १० आणि महिला ६ आहेत. समुद्रपूरमध्ये २ रुग्णांमध्ये १ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील बाधितांचा एकूण आकडा ४२५८ इतका आहे. रविवारी ९४ कोरोना रुग्णांनी कोरोनापासून मुक्ती मिळविली. आतापर्यंत एकूण २२०० जणांना कोरोनावर मात करता आली. जेव्हा की, १०५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्याच्या काळात १९४३ ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.