प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. संचारबंदी असताना रविवारी हाती आलेल्या कोरोना चाचणी अहवालात बाधितांचा आकडा वाढला असून 153 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे.

    वर्धा (Wardha).  जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. संचारबंदी असताना रविवारी हाती आलेल्या कोरोना चाचणी अहवालात बाधितांचा आकडा वाढला असून 153 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. यासाठी 1521 रुग्णांची चाचणी घेण्यात आली होती. आज तीन रुग्णांचा मृत्यू झाला.

    त्यात वर्धा 79 , देवळी 19 , सेलू 08 , हिंगणघाट 24,आष्टी 15 , आर्वी 04 , कारंजा 04 ,अशा एकूण 153 रुग्णांचा समावेश आहे. त्यातील 94 पुरुष तर 59 महिला आहेत. गेल्या 24 तासात 1521 कोरना चाचण्या करण्यात आल्या. आज 450 रुग्ण आयसोलेशनमध्ये आहेत. आज 133 कोरोनामुक्त झाले असून एकूण 10 हजार 314 कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी तीन रुग्णांचा म्रुत्यू झाला असून एकूण 329 जणांचा बळी गेला आहे.

    संचारबंदीच्या दिवशीच मोठा आकडा
    मागील आठवड्यात 15 फेब्रुवारी 10, 16 फेब्रुवारीला 90, 17 फेब्रुवारीला 85, 18 फेब्रुवारीला 89, 19 फेब्रुवारीला 108, 20 फेब्रुवारीला 56 आणि आज संचारबंदी च्या दिवशी 21 फेब्रुवारीला 153 यांचा आकडा पुढे आला आहे.