wardha news

या प्रकरणी हिंगणी ग्रामपंचायतचे सचिव ईश्वर मेशरे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ते तांत्रिक काम आहे. ते माझे काम नसून अभियंत्याचे आहे. मला यातले काहीच कळत नाही.

  • रेती ऐवजी चुरीचा वापर

सेलू. हिंगणी येथील वॉर्ड क्रमांक १ सुभेदार लेआऊट येथे सभागृह ते कोकाटे यांचे घरापर्यत सिमेंट काँक्रीट रोडचे बांधकाम सुरू आहे. या कामात कंत्राटदार शासनाच्या नियमाप्रमाणे एकही काम करीत नाही. रेती ऐवजी चुरीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी याकामाचा विरोध करीत काम बंद पाडले आहे.

हिंगणी येथे सभागृत ते कोकाटे यांचे घरापर्यत करण्यात येत असलेले सिमेंट रस्त्याचे काम करण्यात येत आहे. सदर काम करणारा कंत्राटदार एका राजकीय पक्षाचा सचिव आहे. त्यामुळे अधिकारी व पदाधिकारी दबावात आहे. तालुक्याच्या धामणगाव येथे सुद्धा दस्ट वापरून बोगस काम केले. मोठे काम एका दिवसात पूर्ण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. काळ्यामातीवर रेतीच्या जागेवर चुरीचा उपयोग करून काम सुरू केले.

स्थानिक लोकांनी विरोध केला असता तुम्हाला जे करायचे ते करा, माझे कोणी काही करू शकत नाही, अशी धमकी दिली. शेवटी नागरिकांनी गावातील पत्रकारांना काम पाहण्यासाठी बोलाविले. कामात भ्रष्ट्राचार करण्यात असल्याचे दिसून आले. यावेळी कोणताही शासकीय अधिकारी उपस्थित नव्हता.

शेवटी गावातील लोकांनी काम बंद पाडले होते. यानंतर परत काम सुरू करण्यात आले. पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंत्यांनी कामाची कधीच पाहणी केली नाही. जनतेच्या पैशाचा निव्वळ चुराडा करण्यात आला आहे. झालेल्या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी. अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

तालुक्यात मी एकटाच अभियंता
याप्रकरणी पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता साहिल खरवडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, तालुक्यात मी एकटाच अभियंता आहे. तालुक्यातील सर्व गावामध्ये मला पोहचता येत नाही. संपूर्ण काम ठेकेदार व सचिव पाहत आहे, असेही त्यांनी सांगितले.

ते माझे काम नाही
या प्रकरणी हिंगणी ग्रामपंचायतचे सचिव ईश्वर मेशरे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ते तांत्रिक काम आहे. ते माझे काम नसून अभियंत्याचे आहे. मला यातले काहीच कळत नाही.