मनरेगाच्या कामात भ्रष्टाचार; लिपीकावर गुन्हा दाखल

वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्याच्या येणगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या मनरेगाच्या कामात भ्रष्टाचार करण्यात आला. याप्रकरणी लिपिकाचे विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी लिपिक किशोर हिंगवे याचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कारंजा (घाडगे) (Karanja Ghadge).  वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्याच्या येणगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या मनरेगाच्या कामात भ्रष्टाचार करण्यात आला. याप्रकरणी लिपिकाचे विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी लिपिक किशोर हिंगवे याचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्याच्या येणगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पांदण रस्त्याचे काम करण्यात आले. परंतु, याकामात भ्रष्टाचार करण्यात आला. ही बाब स्पष्ट झाल्याने कारंजा पोलिसात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कैलास वानखडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओम्बासे यांच्या आदेशावरून कारंजा पोलिसात तक्रार केली. त्याआधारे पोलिसांनी लिपीक किशोर हिंगवे यांचेवर गुन्हा दाखल केला. 10 जून 2019 ते 7 जुलै 2019 या कालावधीत या पांदण रस्त्याचे काम करण्यात आले होते. व काम करते वेळी मनरेगा कायद्याचे पूर्णपणे उल्लंघन केल्याचा आरोप कामावर लिपीक म्हणून काम पाहणारे किशोर हिंगवे यांच्या विरोधात करण्यात आला.

मनरेगा कलम 25 अंतर्गत विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी सुद्धा किन्हाळा येथेसुद्धा मनरेगाच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचारात किशोर हिंगवे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या पांदण रस्त्याच्या कामात 7 लाख 35 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीचे बयाणानंतर मोठे मासे अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात सचिन मानकर तपास करीत आहे.