wardha kapus kharedi

  • कापसाला ४७२५ रूपये व  सोयाबीनला ४२११ रूपये भाव
  • चोरडिया इंडस्ट्रीजमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ

समुद्रपूर. कृषि उपज बाजार समिती समुद्रपूर अंतर्गत जाम येथील श्रीवास जिनींग प्रेसिंगमध्ये तर नंदोरी येथील चोरडिया इंडस्ट्रीजमध्ये आज कापूस खरेदी शुभारंभ करण्यात आला. कापसाला ४ हजार ७२५ रूपये तर सोयाबीनला ४  हजार २११ रूपये भाव देण्यात आला.

हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सहकार महर्षी ॲड. सुधीर कोठारी कोठारी यांचे हस्ते व  बाजार समितीचे सभापती हिम्मत चतुर यांचे अध्यक्षतेत कापूस खरेदीला सुरवात करण्यात आली. यावेळी  कापसाला ४  हजार ७२५ रूपये भाव देण्यात  आला. पहिल्या पाच शेतक-यांचा  ॲड. सुधीर कोठारी, संचालक हिम्मत चतुर, गजानन शेंडे, माजी संचालक शांतीलाल गांधी, श्रीवास जिनींगचे राधेश्याम  श्रीवास यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. काटा पूजन महेश झोटींग तर प्लेटफार्म पूजन रोहित श्रीवास यांनी केले.

सोयाबीनला ४ हजार २११ रूपये भाव
यावर्षी सोयाबीन पिकावर रोगाचे आक्रमण व पावसाने बुरशी आल्याने एकरी एक क्विंटल पर्यंत पीक हाती आले. पीक खराब  असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण  झाले आहे.  दोनही इंडस्ट्रीजमध्ये सोयाबीन खरेदीला सुरूवात करण्यात आली आहे. सोयाबीनला अधिकाधिक भाव देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. खरेदी शुभारंभ प्रसंगी सोयाबीनला ४ हजार २११ रूपये भाव देण्यात आला.

शुभारंभ प्रसंगी आलेल्या पहिले पाच शेतकरी योगेश आड़े, अंजन चौधरी, ज्ञानेश्वर धोटे, दीपक पाल, रूपेश मडावी यांचा ॲड. सुधीर कोठारी, हिम्मत चतुर, मनीष निखाड़े, संचालक, व्यापा-यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी  ॲड. सुधीर कोठारी म्हणाले की, यावर्षी शेतक-यांची परिस्थितीत फारच खालावली आहे. अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहिली नाही. बाजार समितीच्या मासिक सभेत शेतक-यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव पारित करण्यात यावा.  केंद्र व महाराष्ट्र सरकारला ठराव पाठवावे, असे सांगितले.
यावेळी  बाजार समितीचे उपाध्यक्ष मनीष निखाड़े, संचालक अशोक वांदीले, महेश झोटींग, अभय कोठारी, गंगाधर हिवंज, जनार्धन हुलके, उल्हास कोटमकर, जीवन गुरनुले, वसंता महाजन, शरद कारमोरे, महादेव बादले, गणेश वैरागड़े, संजय तुराळे, भोजराज दळने, रेखाताई जोगवे, ललिता गुळघाने, आशा भगत, गजानन शेंडे, माजी संचालक शांतीलाल गांधी, रवींद्र झाडे, व्यापारी पांडुरंग बाभुळकर, प्रभाकर हरदास, गजानन निघोट, शरद डहाके, पूनम ट्रेडर्स, अडते प्रवीण जिकार, वसंता चंदनखेडे, हारुल हरदास, अभय लोहकरे, ज़मीर गणी, अरविंद कांबळे, विकास भोयर, नामदेव तडस, वामन फटींग, शालिक वैद्य, रामभाऊ चौधरी आदी उपस्थित होते.       संचालन सचिव शंकर धोटे यांनी केले.  आभार शरद कारमोरे या.नी मानले.
आयोजनाकरिता  लक्ष्मण वांदीले, शेखर राऊत, दिलीप चौधरी, जनार्धन राऊत, गजानन झाडे, विमल नागापूरे यांनी प्रयत्न केले.