कापूस खरेदी केंद्र, वर्धा
कापूस खरेदी केंद्र, वर्धा

वर्धा (Wardha) : दरवर्षी दस-याला सुरू होणारी कापूस खरेदी यावर्षी सततच्या पावसाने पिकामध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता असल्याने शुभारंभ लांबणीवर जाऊ शकतो. कोणत्याही पिकांमध्ये किमान बारा टक्के आर्द्रता असणे गरजेचे आहे. सीसीआयने कापूस खरेदीची पूर्वतयारी पूर्ण केली केली असली तरी दिवाळीपूर्वी शुभारंभ होणार नाही, असे सूत्रांकडून माहिती मिळते.

वर्धा (Wardha) : दरवर्षी दस-याला सुरू होणारी कापूस खरेदी यावर्षी सततच्या पावसाने पिकामध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता असल्याने शुभारंभ लांबणीवर जाऊ शकतो. कोणत्याही पिकांमध्ये किमान बारा टक्के आर्द्रता असणे गरजेचे आहे. सीसीआयने कापूस खरेदीची पूर्वतयारी पूर्ण केली केली असली तरी दिवाळीपूर्वी शुभारंभ होणार नाही, असे सूत्रांकडून माहिती मिळते.

जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कापूस उत्पादक शेतक-यांच्या सोयीकरिता पूर्व नोंदणीची तयारी केली आहे. सर्वात जास्त हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 13 हजार 465 व समुद्रपूर येथे 7 हजार 168 शेतक-यांनी नोंद केली आहे. सेलू येथे 5 हजार 600, वर्धा 4,833, आर्वी 4 हजार 359, देवळी 3 हजार 500,कारंजा 700, आष्टी 323 कापूस उत्पादक शेतक-यांनी बाजार समित्यांमध्ये नोंद करून घेतली आहे. सीसीआयने कापूस खरेदीसाठी निविदा काढून येथील जिनिंग मालका सोबत करार सुद्धा केलेले आहेत. हिंगणघाट तालुक्यात, हिंगणघाट, वडनेर व समुद्रपूर तालुक्यामध्ये कांढळी, जाम, धोंडगाव व साखरा तर सेलू तालुक्यात सेलू व सिंदी,आर्वी तालुक्यात दोन केंद्र, वर्धा तालुक्यात वायगाव येथील केंद्रावर सर्व तयारी झाली आहे.

http://://www.navarashtra.com/wardha-news-marathi/intercity-express-should-start-immediately-demand-of-mp-ramdas-tadas-39837/

आष्टी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नंदकुमार वरकड यांनी सांगितले की, आमच्याकडे सीसीआय मार्फत खरेदी होत नाही. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ कापसाची खरेदी करते. परंतु अद्याप या संस्थेने येथील जिनिंग सोबत कुठलाही संवाद केला नाही. आम्ही शेतक-यांची कापूस खरेदी पूर्वची नोंद केली आहे. सध्या सोयाबीन खरेदीला प्रारंभ झाला असून दोन दिवसात सोळाशे क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. शेतक-यांनी बाहेर सोयाबीन न विकता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणूनच विकावे, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.

यावर्षीच्या कापसाचे पेरणी क्षेत्राची माहिती देताना जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे यांनी सांगितले की, यंदा 2 लाख 14 हजार हेक्टर मध्ये कपाशीची लागवड झालेली आहे. ओलिताच्या शेतातून एकरी आठ ते दहा क्विंटल कापूस व कोरडवाहू शेतातून एकरी चार ते पाच क्विंटल कापसाचे उत्पादन होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नवराष्ट्रशी बोलताना सांगितले. सध्या शेतकरी सोयाबीन पिकाच्या कापणीला लागला आहे. अनेकांनी सोयाबीन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायला सुद्धा नेले. शेतक-यांच्या हाती पैसा आल्यावर बाजारात आर्थिक व्यवहार होतात. यंदा सोयाबीनच्या पिकात 70 टक्के नुकसान शेतक-यांचे झाले आहे. सेलू तालुक्यातील धानोली ,येथील शेतकरी स्वप्निल सुधाकरराव भोयर यांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा एकरात सोयाबीन फक्त बावीस क्विंटल झाल्याचे त्यांनी सांगितले. एकरी एक ते दोन पोत्याचे सरासरी उत्पादन झाल्याचे त्यांनी सांगितले.

परतीचा पाऊस सध्या थांबलेला नसल्याचे चिन्ह आजही पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. ते म्हणाले की, कापूस फुटलेला आहे. परंतु पंधरवड्यात झालेल्या पावसाने कापूस ओला आहे. जोपर्यंत कडक ऊन पडत नाही, तो पर्यंत कापूस वेचला जाणार नाही. रसुलाबाद येथील शेतक-यांकडे तर लोंबकळत असलेल्या कापसाच्या पिकातून बीज अंकुरले. निसर्गाने यंदा शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणले. येणा-या दिवसात नवरात्र दसरा व दिवाळी आहे. सण साजरे करण्याकरिता शेतक-यांच्या हाती पैसा गरजेचा आहे. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातून यंदा शेतक-यांचा खर्च सुद्धा निघालेला नाही. अशा परिस्थितीत शेतक-याला होणा-या कापसाच्या उत्पादनातून हात उसने आणलेले पैसे व बँकेतील कर्ज भरावे लागणार आहे.  सीसीआयने जर कापूस खरेदी लांबवली तर परिस्थिती बिघडणार आहे. सरकारने हमी भाव जाहीर केल्याप्रमाणे कापसाला यंदा बारा टक्के आर्द्रता असणा-या पिकाला 5 हजार 496 रुपये, आठ टक्के आर्द्रता असणा-या कापसाला 5 हजार 775 रुपये इतका भाव दिला जाणार आहे. शेतक-यांसाठी नेहमी एक वाक्य बोललं जातं जोपर्यंत शेतातील टवटवीत पीक शेतक-यांचा उंबरठा ओलांडून घरात येत नाही, तोपर्यंत ते त्याचं नसतं, हेच खरं आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी सुरू करावी

सुधीर कोठारी

कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून शेतक-यांना सेवा देण्यासाठी कापूस खरेदीची पूर्वतयारी आमची झालेली आहे. सीसीआयने अद्याप तारीख निश्चित केली नाही. परंतु नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी सुरू करायला काहीच हरकत नाही. अन्यथा व्यापारी याचा गैरफायदा घेतील.–ॲड. सुधीर कोठारी, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट.