प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

नजीकच्या रोठा येथील शेत शिवारातून ६० हजार रूपये किमतीचा १२ क्विंटल कापूस चोरी करण्यात आला. ही घटना ६ डिसेंबर रोजी घडली.

वर्धा (Wardha). नजीकच्या रोठा येथील शेत शिवारातून ६० हजार रूपये किमतीचा १२ क्विंटल कापूस चोरी करण्यात आला. ही घटना ६ डिसेंबर रोजी घडली.

सिंदी मेघे परिसरातील विजय काशीकर (60) यांचे रोठा शिवारात शेत आहे. त्यांनी कापसाची वेचणी करून शेतातील बंडयात कापूस ठेवला होता. तो 60 हजार रूपये किमतीचा 12 क्विंटल कापस अज्ञात चोरटयांनी चोरून नेला. विजय काशीकर यांच्या तक्रारीवरून सावंगी पोलिसांनी अज्ञात चोरटयाचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामदास बिसणे करीत आहे.