वर्धा जिल्ह्यात कोविडमुळे तीन दिवसांत १३ मृत्यू; बीपी, शुगर असणा-यांना अधिक धोका

गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग या आजाराने थैमान घातले असून मृत्यूचा आकडाही वाढतीवर आहे. एक ते तीन एप्रिल या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 457 जण दगावले आहेत.

    वर्धा (Wardha).  गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग या आजाराने थैमान घातले असून मृत्यूचा आकडाही वाढतीवर आहे. एक ते तीन एप्रिल या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 457 जण दगावले आहेत.

    जिल्ह्यात 1 एप्रिल रोजी 285 रुग्ण आढळून आले तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तिघेही 54 ते 80 वर्ष वयोगटातील आहेत. त्यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. 2 एप्रिल रोजी 399 बाधित झाले असून पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात 45 ते 75 वर्ष वयोगाटातील आहेत. त्यामध्ये दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. तर 3 एप्रिल रोजी हाती आलेल्या कोरोना चाचणी अहवालात 167 बाधित झाले असून पाच जणांचा मृत्यू झाला.

    यात एक 36 वर्षांची व्यक्ती असून इतर 44 ते 65 वयोगटातील आहेत. यावरून 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. आजपर्यंत जिल्ह्यात 457 मृत्यू झाले असून त्यात 40 ते त्यापेक्षा अधिक वयाचे 135 रुग्ण आहेत. कोरोनाने दगावणा-या रुग्णांमध्ये बीपी, शुगर, हायपर टेन्शन, दमा, भीती, र्हदयविकार यामुळे मरणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यासाठी नागरिकांनी कोरोनाची भीती न बाळगता निर्भिडपणे त्याचा सामना करण्याची गरज आहे.

    शनिवारी १६७ बाधित रुग्ण आढळले
    हाती आलेल्या चाचणी अहवालात शनिवारी 167 बाधित झाले आहेत. त्यात वर्धा 116 ( पुरुष 64 महिला 52), हिंगणघाट 23 (पुरुष 08 महिला 15), देवळी 14 (पुरुष 07 महिला 07), आर्वी 03 (पुरुष 02 महिला 01), आष्टी 02 (पुरुष 00 महिला 02), कारंजा 0, समुद्रपूर 05 (पुरुष 04 महिला 01), सेलू 04 (पुरुष 03 महिला 01) यांचा समावेश आहे. त्यात 88 पुरुष तर 79 आहेत.