शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; पावसाने दडी मारल्याने पिकांना फटका

मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी (due to lack of water.) पीके वाळू लागली आहेत. (the crops have started drying up) त्याचा परिणाम सोयाबीन, कापूस (soybean and cotton) या पिकांवर विविध किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

  वर्धा (Wardha).  मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी (due to lack of water.) पीके वाळू लागली आहेत. (the crops have started drying up) त्याचा परिणाम सोयाबीन, कापूस (soybean and cotton) या पिकांवर विविध किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कास्तकारांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

  जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी सरासरी साडेचार लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी आजपर्यंत 4 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकूण क्षेत्राच्या 80 क्षेत्रावर सोयाबीन, कापसासह इतर पिकांची पेरणी झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पेरणी जवळपास आटोपण्याच्या मार्गावर आहे. सुरुवातील चांगला पाऊस झाल्याने कास्तक-यांनी कापसाची लागवड केली तसेच सोयाबीनची पेरणी करण्यात आली.

  पिकांची उगवण चांगल्याप्रकारे झाली असताना आता पावसाने दडी मारली आहे. त्याचा परिणाम पेरणी केलेल्या जमिनीला भेगा पडत असून पीके वाळू लागली आहेत. तसेच पावसाच्या उघडीपमुळे विविध किडींचा प्रादुर्भाव झाल्याने पीके जमिनीवर येण्याआधीच फस्त केली जात आहेत. त्यामुळे शेतक-यांना या संकटाचा सामना करावा लागत आहे.

  गतवर्षीपेक्षा पाच टक्के अधिक पाऊस
  पावसाळ्यास प्रारंभ झाला तेव्हापासून जिल्ह्यात आजपर्यंत 26.33 टक्के पाऊस झाला आहे. तर गतवर्षी 3 जुलैपर्यंत 21.05 टक्केच पर्जन्यमान झाले होते. मागील वर्षीची तुलना केली असता यंदा पाच टक्के जास्त पाऊस पडला. मात्र, पर्जन्यमान जास्त झाले असले तरी पिकांची पेरणी केल्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने त्याचा फटका पिकांना बसला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पावसाने दडी मारल्यास शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.

  काही भागातील पेरण्या खोळंबल्या
  जिल्ह्यात आजघडीला खरीप हंगामाची 4 लाखांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी करण्यात आलेली आहे. पण, काही भागात अजूनही चांगला पाऊस झाला नसल्याने शेतकरी पेरणीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे.

  पिकांची स्थिती नाजूक
  गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांची परिस्थिती नाजूक झाली आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस आला नाही तर पीके हातची जातील. त्यामुळे दुबार पेरणी करण्याचे संकट शेतक-यांसमोर आहे.
  -गजानन झाडे, शेतकरी कुटकी

  पीके वाळू लागली
  पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे मागील 20 दिवसांपूर्वी सोयाबीनची पेरणी केली. तसेच त्यापूर्वी कापसाचीही लागवड केलेली आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके वाळू लागली आहेत.
  –प्रशांत नागतोडे, शेतकरी सेवाग्राम

  किडींचा प्रादुर्भाव वाढला
  पिकांची पेरणी करूनही मागील काही दिवसांपासून पाऊस आलेला नाही. त्यामुळे सोयाबीन व कापूस या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला असून उगवत्या पिकांची पाने कुर्तडली जात आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गापुढे नवे संकट ओढवले आहे.
  –विमलबाई भोकरे, शेतकरी कुटकी