सेलू तालुक्यातील तुरीच्या शेंगांचे निरीक्षण करताना कृषी अधिकारी
सेलू तालुक्यातील तुरीच्या शेंगांचे निरीक्षण करताना कृषी अधिकारी

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील तुरीचे पिकावर मोठया प्रमाणात अळयांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतक-यांनी कृषी विभागाचे अधिका-यांना मार्गदर्शन करण्याची मागणी केली होती. यामुळे तालूका कृषी अधिका-यांनी गिरोली ढगे परिसरात तुरीच्या पिकाची पाहणी केली. तुरीचे पिकावर शेंगा खाणा-या अळया आढळून आला. यावेळी कृषी पर्यवेक्षक मनोहर दांडेकर, कृषी सहायक एस.एम. महाकाळकर उपस्थित होते.

सेलू (Selu).  वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील तुरीचे पिकावर मोठया प्रमाणात अळयांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतक-यांनी कृषी विभागाचे अधिका-यांना मार्गदर्शन करण्याची मागणी केली होती. यामुळे तालूका कृषी अधिका-यांनी गिरोली ढगे परिसरात तुरीच्या पिकाची पाहणी केली. तुरीचे पिकावर शेंगा खाणा-या अळया आढळून आला. यावेळी कृषी पर्यवेक्षक मनोहर दांडेकर, कृषी सहायक एस.एम. महाकाळकर उपस्थित होते.

सोयाबीन व कापसाच्या पिकाचे नुकसान झाल्याने आता शेतक-यांची भिस्त तुरीचे पिकावर आहे. आठवडयापासून ढगाळी वातावरण असल्याने तुरीचे पिकावर शेंगा खाणा-या अळयांचा प्रादुर्भाव झाला आहे. यात शेतक-याचे नुकसान होत आहे. याची माहिती कृषी विभागाला देत योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले होते. कृषी विभागाच्या अधिका-यांनी अळयांची ओळख केली आहे. अळयांपासून पिकांना वाचविण्यासाठी शेतक-यांना योग्य ते उपाय सांगण्यात आले आहे. चणा पिकावरही मर रोगाचा प्रादुर्भाव आला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ट्रायकोडर्मा वीरीडी 10 किलो प्रती हेक्टर पाणी देण्यापूर्वी शेतात टाकावे, असे दांडेकर यांनी सांगितले. यावेळी पदमाकर भोंगाडे, नामदेव पाटील, देविदास वडे, विलास भोंगाडे व अन्य शेतकरी उपस्थित होते.