वर्धा बोरधरण
वर्धा बोरधरण

कोरोना संक्रमण काळामुळे प्रवासासाठी बंदी अलेल्या प्रवाश्यांना आता एका जिल्हयातून दुस-या जिल्ह्यात प्रवास करता येतो. यांसह पर्यटनस्थळे देखील नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने सलग तीन दिवस सुट्टया आल्या आहेत. त्यामुळे जिल्हयातील पर्यटकांसह अन्य जिल्हयातील पर्यटकांची बोरधरण येथील बोरव्याघ्र परिसरात पर्यटकांची गर्दी ऊसळणार आहे.

वर्धा (Wardha).  कोरोना संक्रमण काळामुळे प्रवासासाठी बंदी अलेल्या प्रवाश्यांना आता एका जिल्हयातून दुस-या जिल्ह्यात प्रवास करता येतो. यांसह पर्यटनस्थळे देखील नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने सलग तीन दिवस सुट्टया आल्या आहेत. त्यामुळे जिल्हयातील पर्यटकांसह अन्य जिल्हयातील पर्यटकांची बोरधरण येथील बोरव्याघ्र परिसरात पर्यटकांची गर्दी ऊसळणार आहे.

कोरोना संकटाचे काळात देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. एका जिल्हयातून दुस-या जिल्हयात जाण्यास मनाई होती. यांसह पर्यटनस्थळे बंद करण्यात आली. अनेक दिवस नागरिकांना घरीच बसून राहावे लागले. परंतु, आता अनलॉकमध्ये परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. बंद असलेल्या बसेस देखील सुरू करण्यात आल्यात. एका जिल्हयातून दुस-या जिल्हयात विनापरवानगीने जाता येते. यातच राज्य शासनाने पर्यटनस्थळे खुली केली आहे. शुक्रवारी असलेला ख्रिसमस नंतर शनिवार व रविवार सलग तीन दिवस शासकीय कर्मचा-यांना सुट्टया आल्या आहे. वर्धा जिल्हयाच्या सेलू तालुक्याच्या बोरधरण येथे असलेला व्याघ्र प्रकल्प जिल्हयातील एकमेव पर्यटनस्थळ आहे.

येथील नैसर्गिक सौदर्याने नटलेला परिसर व धरण हे पर्यटकांना आकर्षित करते. जिल्हयातीलच नव्हे तर नागपूर, गोंदिया, भंडारा व ईतर जिल्हयातील पर्यटक येतात. कोरोना संकटाचे काळात हा व्याघ्र प्रकल्प बंद करण्यात आला होता. परंतु, आता तो पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. ख्रिसमस पासून शनिवार व रविवार अशा तीन दिवस शासकीय सुट्टया आल्या आहेत. त्यामुळे तीन दिवस येथे पर्यटकांची गर्दी उसळणार आहे. यामुळे वनविभागाचे वतीने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाय करण्यात आले आहे.

नक्की होते वाघांचे दर्शन
बोरधरण येथील व्याघ्रप्रकल्पात विविध प्रजातींचे पशु व पक्षी आढळून येतात. यांसह काही वाघ व वाघिणींचा देखील समावेश आहे. त्यांची संख्या ही ब-यापैकी आहे. येथे दिवसा व रात्रीचे दरम्यान वाघ व वाघिणीचे हमखास दर्शन होते. त्यामुळे वाघ बघण्यासाठी पर्यटक येतात. पर्यटकांना वाघ बघण्यासाठी जाळी लावलेली विशेष गाडी वनविभागाचे वतीने उपलब्ध करण्यात आली आहे.

धरणालाही देतात भेट
बोरधरण येथील व्याघ्र प्रकल्प हा नैसर्गिक सौदर्याने नटलेला आहे. येथील निसर्गरम्य परिसर पर्यटकांचे आकर्षण आहे. सोबतच याच ठिकाणी मोठे धरण आहे. यावर्षी हे धरण पूर्णपणे भरले आहे. यामुळे दोन वेळा धरणातून पाणी सोडण्यात आले. सध्या धरणात मोठया प्रमाणात पाणी साठा आहे. पाणी सोडतांनाचे विहंगमदृष्य पाहण्यासाठी जिल्हयासह अन्य जिल्हयातील पर्यटकांनी गर्दी केली होती. परंतु, त्यापासून त्यांना वंचित राहावे लागले. ही संधी आता उपलब्ध नसली तर धरणात असलेले पाणी देखील पर्यटकांचे आकर्षण आहे.

बौध्द स्तुपाचे आकर्षण
बोरधरण येथील निसर्गरम्य परिसरात ऊंच ठेकडीवर जापानी पध्दतीने बनविलेले बौध्द स्तुप बांधण्यात आले आहे. त्याटेकडीवरून येथील निसर्ग पाहण्याचा आनंद काही अधिकच आहे. यामुळे अनेक पर्यटक येथील बौध्दस्तुप पाहण्यासाठी येतात.