दुकानावर झाड कोसळल्याने दीड लाख रुपयांच्या साहित्याचे नुकसान

हिंगणघाट (Hinganghat) : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानावर झाड कोसळल्याने दुकानातील दीड लाख रूपयांच्या साहित्याचे नुकसान झाले. यामुळे दुकानाच्या संचालकांनी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.

हिंगणघाट (Hinganghat): वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानावर झाड कोसळल्याने दुकानातील दीड लाख रूपयांच्या साहित्याचे नुकसान झाले. यामुळे दुकानाच्या संचालकांनी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.

शहरातील टिळक चौकात नवनीत रपाटे यांचे रेणुका इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान आहे. दुकानावर वृक्ष कोसळल्याने टिनाचे शेड पूर्णपणे तुटले. दुकानात ठेवलेले एक लक्ष पन्नास हजार रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्याचे नुकसान झाले. असे दुकान संचालक नवनीत रपाटे यांनी सांगितले. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती योजने अंतर्गत तलाठ्यांनी नुकसानीचा पंचनामा करून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केशव तितरे यांनी तहसीलदार श्रीराम मुंदडा यांचेकडे केली आहे.