परतीच्या पावसाने वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे झालेले मोठे नुकसान
परतीच्या पावसाने वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे झालेले मोठे नुकसान

साहूर (Sahur) :  वर्धा जिल्ह्यातील साहूर गावात परतीचा पाऊस शेतक-यांच्या जिवावर उठल्याने कस-बस थोडाफार घरात येणार सोयाबीन पीकही माती मोल झाले. आता जगण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने शेतक-यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. कोरोनाने बिकट स्थिती निर्माण होताच संचारबंदीने शेतक-यांचे कंबरडे मोडले अव्वाच्या सव्वा भावाने पेरणीसाठी बियाणे खरेदी करावे लागले.

शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने सोयाबीन पीक उभे केले. पिके डोलू लागत असताना खोडमाशीच्या प्रादूर्भावाने 75 टक्के ते 80 टक्के सोयाबीनचे उत्पन्न हातचे गेले. अशातच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने काहींनी उर्वरित सोयाबीन पीक कापून ठेवले. तर काही कापण्याच्या तोंडावर शेतातच उभे आहेत. मात्र या सततच्या पावसाने यावर्षी सोयाबीन पिकाची माती झाली असे चित्र निर्माण झाले आहे.

हातचे होते नव्हतं सर्व पिके उध्वस्त झाल्यानंतरही राहिलेल्या सोयाबीनच्या कापणी करता मोठा खर्च करून सोयाबीनची सवंगनी केली मात्र विजांच्या कडकडाटासह आलेला पाऊस शेतक- यांच्या जीवावर उठला. पुढल्या वर्षीच्या पेरणीसाठी बियाणे म्हणून देखील सोयाबीन शिल्लक राहणार नाही किंवा विकत मिळणार नाही अशी परिस्थिती सध्याच्या वातावरणामुळे निर्माण झाली आहे. निसर्गाने मारलं आणि शासन प्रशासनाने हात वर केले. आता काय करावे असा प्रश्न शेतक-यांपुढे निर्माण झाला आहे.