पाच वर्षांपासून पथदिव्याअभावी रस्त्यावर पसरला काळोख

शहरात २०१५ मध्ये एका व्यक्तीने गावालगत असलेले शेत विकत घेऊन त्या भूखंडावर लेआऊट पाडले. या ठिकाणी सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येईल,असे आश्वासन देत ओमकारनगर ६ येथील प्लॉट विकले. परंतू अजूनपर्यंत या लेआऊटमध्ये इलेक्ट्रॉनिक पोलवरील पथदिवे व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या नाही. त्यामुळे गत पाच वर्षांपासून या परिसरात असुविधांनी कळस गाठला असून पथदिव्यांअभावी रस्त्यावर काळोख पसरला आहे. यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

  • वार्ड नंबर ६ ओमकार नगर लेआऊटमध्ये असुविधांचा कळस

समुद्रपूर (Samudrapur):  शहरात २०१५ मध्ये एका व्यक्तीने गावालगत असलेले शेत विकत घेऊन त्या भूखंडावर लेआऊट पाडले. या ठिकाणी सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येईल,असे आश्वासन देत ओमकारनगर ६ येथील प्लॉट विकले. परंतू अजूनपर्यंत या लेआऊटमध्ये इलेक्ट्रॉनिक पोलवरील पथदिवे व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या नाही. त्यामुळे गत पाच वर्षांपासून या परिसरात असुविधांनी कळस गाठला असून पथदिव्यांअभावी रस्त्यावर काळोख पसरला आहे. यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

या ठिकाणी सिमेंटचे रस्ते बनवले नाही तर पावसाळ्याचे व सांडपाणी जाण्यासाठी नाल्यांचे बांधकामसुध्दा नियोजनबध्दरित्या करण्यात आले नसल्याने संपूर्ण परिसरात पावसाळ्यात चिखल साचालेला असतो. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावर सिमेंटचे पोल आहे. परंतु यावर पथदिवे बसविले नाही. यामुळे नागरिकांना काळोखा सोबतच दुर्गंधीचाही सामना करावा लागत आहे. यासंबंधी नगरपंचायत व लेआऊट धारकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याची वारंवार मागणी करण्यात आली आहे. परंतू याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप  विद्या सांयकार, वर्षा साबळे, महेंद्र झाडे, शशिकांत आडकीने, सोनाली खडसे, सुधीर साळवे, दुर्गा डोंगरे, किशोर क्षिरसागर, गंगाधर राऊत, किशोर ठाकरे, होमराज दांडे, नामदेव धडंगे, व मनोज खोडे आदींनी केला आहे.