भरदिवसा दरोडा टाकणाऱ्यांना अटक; रामनगर पोलिसांची विशेष कामगिरी

बँकेतून रोख रक्कम काढणाऱ्या वृद्ध इसमाला टारगेट करून रस्त्यावर हिसका देऊन बॅग ओढणार्या दोन आरोपीला रामनगर पोलिसांनी सलग आठ दिवस सापळा रचून शिताफीने अटक केली.

  वर्धा (Wardha).  बँकेतून रोख रक्कम काढणाऱ्या वृद्ध इसमाला टारगेट करून रस्त्यावर हिसका देऊन बॅग ओढणार्या दोन आरोपीला रामनगर पोलिसांनी सलग आठ दिवस सापळा रचून शिताफीने अटक केली. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार नसून ग्रामीण भागात रोजगार न मिळाल्यामुळे या गुन्हेगारीकडे वळलेले आहे.

  रामनगर पोलीस ठाण्यात आज सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप आणि पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. 11 फेब्रुवारीला हींदनगर येथील आरोग्य विभागातून निवृत्त झालेले मारोती हिवसे वय 76 स्टेट बँकेमध्ये 20,000 रोख रक्कम काढून घरी परतत असताना गोरस भंडार जवळ एका अज्ञात इसमाने बॅग पळवून नेली होती.

  याच प्रकारची दुसरी घटना हिंदनगर परिसरात वय 86 कृष्णा ताकसाळे या सेवानिवृत्त वृध्दासोबत 11 मार्चला घडली. यांच्याकडून या अज्ञात आरोपींनी 74,000 रुपये लुटले. पोलिसापुढे वाटमारीचे आव्हान होते. पोलिसांनी अतिशय शिताफीने एकुर्ली गावातील निलेश विनायक गिरडकर वय 32, चंद्रकांत दशरत काटकर वय 25 यांना ए.एस. उदयसिंग बोरवाल,अजय अनंतवार, पंकज भरणे, संदीप खरात, अमीत सोर, संतोष कुकुटकर यांनी अटक केली.

  असा रचला सापळा
  दोन्ही बँकेतील घटना घडलेल्या दिवशी चे सीसीटीव्ही फुटेज, फिर्यादीने दिलेल्या माहितीच्या आधारावर रामनगर पोलिसांनी सापळा रचला. संशयिताचे वर्णन प्राप्त झाल्यावर त्यांच्याकडील गाडीचा आरटीओ मार्फत माहिती घेऊन शोध घेतला. ही घटना पुन्हा होऊ शकते असा कयास लावून रामनगर पोलिसांनी बँकेचे ग्राहक बनुन वर्धेतील काही निवडक बँकांमध्ये ट्रप केला. सीसीटीवी फुटेज मध्ये आरोपींनी जीन्स पॅंट घातला होता. या जीन्स पॅन्ट ला पायाकडून मोड मारली होती. या जीन्स पॅन्ट च्या आधारेच पोलिसांनी आरोपीला टार्गेट केले. आरोपीला वापरत असलेल्या गाडीचे सीट कव्हर नवीन असल्याचा संशय आला.

  महाराष्ट्र बँकेमध्ये अशाच प्रकारचा एक इसम दिसल्याने त्याला पकडण्यासाठी पूर्ण टीम कामाला लागली. या इसमाने बँकेतील एका ग्राहकाला पैसे काढताना आणि मोजताना बघितले. तो बाहेर पडला.पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीने कबुलीजबाब दिला.या कामात दोघे असल्याचे यांनी सांगितले. आरोपी शेतकरी असून काही काम धंदा नसल्यामुळे त्यांनीच चोरीचे हत्यार वापरले. आपण कधी पकडले जाणार नाही असा त्यांचा भ्रम होता तो पोलिसांनी हाणून पाडला‌. अशाच प्रकारचा तिसरा गुन्हा हिंगणघाट येथील एका बँकेत केल्याची त्यांनी कबुली दिली.