प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

सामान्य रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेची प्रकृती खालावल्याने सेवाग्राम रुग्णालयात निधन झाले. मात्र बाळ सामान्य रुग्णालयात दाखल आहे. यामुळे सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांची हलगर्जीपणा असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

    वर्धा (Wardha) सामान्य रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेची प्रकृती खालावल्याने सेवाग्राम रुग्णालयात निधन झाले. मात्र बाळ सामान्य रुग्णालयात दाखल आहे. यामुळे सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांची हलगर्जीपणा असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

    संगीता कृष्णा सेलकर (29) रा .पालोती असे मृत महिलेचे नाव आहे. संगीता सेलकर हिला प्रसूतीकरिता दोन दिवसांपूर्वी वर्ध्याच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले. तिला या दरम्यात रक्तदाबाचा आजार जडल्याने आैषधोपचार सुरू झाला. 12 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास प्रसूती शस्त्रक्रिया करण्यात आली. यादरम्यान, रक्तस्राव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अधिक रक्तस्त्राव मुळे रक्तातील प्लेटलेट कमी झाले. त्यामुळे तिची प्रकृती आणखीनच खालावली. त्या अवस्थेत सामान्य रुग्णालयाने सेवाग्राम रुग्णालयात रात्री 9.30 वाजता पाठविण्यात आले.

    सेवाग्राम रुग्णालयात दाखल होताच प्रसूती विभाग प्रमुखासह, मेडिसीन विभाग, अनस्थिसिया विभागाच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही जीव वाचवू शकले नाही. रात्री 12 वाजता तिचे निधन झाले. सेवाग्राम रुग्णालयात रक्तदाबाच्या रुग्णाचा मृत्यू क्वचित होतात .मात्र सामान्य रुग्णालयातून वेळेवर इलाज करण्यात न आल्याने रुग्णांचा जीव गमवावा लागला अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी व्यक्त केली.

    बाळ सामान्य रुग्णालयात
    संगीता सेलकर ही प्रसुतीसाठी सामान्य रुग्णालयात भरती झाल्यानंतर रक्तदाबाचा आजार झाल्याने तिची प्रसूती शस्त्रक्रिया करण्यात आली. तीने बाळाला जन्म दिला. मात्र. तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या बाळाला सामान्य रुग्णालयात दाखल ठेवले आहे.