स्कार्फ, टोप्या, थंड पेयांना मागणी; मार्च महिन्यातच जाणवू लागला मे हिटचा तडाखा

ऊन चांगलीच तापत असल्याने दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बाहेर पडणे अवघड जात आहे. त्यामुळे काहीजण बाहेर पडणेच टाळत आहेत. काही कामानिमित्त बाहेर पडण्याची वेळ आलीच तर महिला व पुरुष दुपट्यांचा वापर करतात.

    वर्धा.  यावर्षी उन्हाचा तडाखा आतापासूनच जाणवू लागला आहे़  मे महिन्यातील हिटचा तडाखा मार्च एडिंगपासूनच सुरू झाल्याने पुढे उन्हाळा चांगलाच तापणार आहे़ उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी आणि स्कार्फला पसंती मिळत असून थंड पेयांच्या गाड्यांवर गर्दी वाढत आहे.

    ऊन चांगलीच तापत असल्याने दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बाहेर पडणे अवघड जात आहे. त्यामुळे काहीजण बाहेर पडणेच टाळत आहेत. काही कामानिमित्त बाहेर पडण्याची वेळ आलीच तर महिला व पुरुष दुपट्यांचा वापर करतात. त्यामुळे बाजारात रंगबिरंगी स्कार्फ पुरुष मंडळींकरिता विविध टोप्या विक्रीस आल्याचे दिसते़  त्याचबरोबर गॉगल्सचे दुकानेही

    जागोजागी दिसून येत आहे़  शहरातील कपडा लाईन, बस स्टॉप, अनेक ठिकाणी दुकान आणि स्टॉलवर टोप्या उपलब्ध आहेत. कॉटन, फॅन्सी, कमांडो, स्पोर्ट, कॉटन, व्हाईट आदी टोप्या असून त्यांना मोठी मागणी आहे. दररोज शहरातून सुमारे मोठ्या प्रमाणात टोप्या विकल्या जात आहेत. कॉटन आणि स्टेफन कॉटन अशा दोन प्रकारचे स्कार्फ उपलब्ध आहेत. दरम्यान, थंडपेयांच्या गाड्या आणि लहान स्टॉल आहेत. त्याचप्रमाणे लिंबूशरबत, लस्सी, उसाचा रसाची विक्री होत आहे. लिंबूसरबत, उसाचा रस दहा रूपये प्रति ग्लास मिळत आहे.