वर्धेचे आमदार समीर कुणावार विकास कामांची पाहणी करताना

हिंगणघाट (Hinganghat): वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात सर्वत्र विकासाचे व सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. या कामाचा दर्जा व कामाच्या प्रगतीबाबत निशानपुरा वार्डातील मुख्य रस्त्याची आमदार समीर कुणावर यांनी शनिवारी पाहणी केली. स्मशानभूमीचे विकास काम व सौंदर्यीकरण व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा उड्डाणपुलाचीची पाहणी करीत 1 महिन्याच्या आत पुलाचे संपूर्ण काम करण्याचे आदेश बांधकाम विभागाचे धमाने, पोफळे यांना दिले.

स्मशानभूमीच्या मुख्य रोडचे काम व रुंदीकरणाचे काम लवकरात-लवकर करण्याचे आदेश बांधकाम विभागाला देण्यात आले. शहरातील जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी राजेश कुबडे, मोहम्मद शेख, चंदनखेडे, भाजपा महामंत्री किशोर दिघे, भाजयुमोचे प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, नगरसेवक चंदू माळवे, राजू गंधारे, बालू वानखेडे, संदीप सुरकार उपस्थित होते.