धूम स्टाईल पद्धतीने दुचाकी पळविणारे
धूम स्टाईल पद्धतीने दुचाकी पळविणारे

काही दिवसांपासून शहरातील मुख्य मार्गावरून धूम स्टाईल पद्धतीने दुचाकी पळविण्याऱ्यांची संख्या वाढली आहे. युवकांमध्ये high speed bike ची क्रेझ निर्माण झाली आहे. यामुळे वरिष्ठ नागरिकांना त्रास होत आहे. रस्त्याने जातांना त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. वाहतूक विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

वर्धा (Wardha). काही दिवसांपासून शहरातील मुख्य मार्गावरून धूम स्टाईल पद्धतीने दुचाकी पळविण्याऱ्यांची संख्या वाढली आहे. युवकांमध्ये high speed bike ची क्रेझ निर्माण झाली आहे. यामुळे वरिष्ठ नागरिकांना त्रास होत आहे. रस्त्याने जातांना त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. वाहतूक विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

सण- उत्सवाचा काळ असल्याने बाजारात नागरिकांची गर्दी होत आहे. अशातच नवयुवक धूम स्टाईलने दुचाकी पळवित आहे. दुचाकी पळविणे युवकांसाठी काही नवीन बाब नाही; परंतु याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे. अनेकदा नियंत्रण सुटल्याने अपघात झाले आहे. अनेकांना जीव गमावावा लागला आहे. काही दिवसांपासून शहरातील वाहतूक व्यवस्था ढासळली आहे.

अनेक चौकात वाहतूक पोलिस दिसून येत आहे. शहरातील बॅचलर रोड, मुख्य मार्ग, आर्वी नाका, धुनिवाले चौक व सेवाग्राम मार्गाने रात्रीचे वेळी हॉर्न वाजवित दुचाकी पळविण्यात येत आहे. यामुळे रात्री फिरायला जाणा-या नागरिकांना त्रास होत आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.