अल्पवयीन मुलीचे शोषण करणाऱ्यास तीन वर्षे सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार आरोपी अजय सुखदेव बोभाटे यास तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षण सुनावली आहे.

    वर्धा (Wardha).  अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार आरोपी अजय सुखदेव बोभाटे यास तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षण सुनावली आहे. हा निकाल येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सूर्यवंशी यांनी दिला.

    तीन हजार दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास तसेच कलम 354 नुसार एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 500 रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, पीडितेच्या वडिलांचा नील अँक्वा हा घरीच व्यवसाय होता. आरोपी अजय सुखदेवराव बोभाटे हा पीडितेच्या वडीलांच्या गाडीवर ड्रायव्हर होता. 4 ऑक्टोबर 2017 ला रात्री आठ वाजताच्या दरम्यान पीडिता ट्युशनला जाते म्हणून घरून निघून गेली.

    रात्री सव्वा आठ वाजता घरी परत आली असता आईने बँग तपासली, मात्र त्यात काहीच मिळाले नाही. त्यानंतर वडिलांनी थापड मारली असता आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांनी वर्धा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

    तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक शुभांगी ताकीत यांनी सबळ पुरावा उपलब्ध करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. शासनातर्फे एकूण चार साक्षीदार तपासले. विशेष सरकारी वकील विनय घोडे यांनी साक्षीपुरावे घेतली. त्यानंतर शासकीय अभियोक्ता जी.व्ही. तकवाले यांनी युक्तिवाद केला.