प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती

प्रेरणा देशभ्रतार यांची वर्ध्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज राज्यात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. 2010 बॅचच्या त्या आयएएस अधिकारी आहे. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार 2019 ला 12 फेब्रुवारीला वर्ध्याला रुजू झाले होते. हे विशेष.अद्याप त्यांच्या बदलीचा आदेश आला नाही. विदर्भातील कन्या वर्धा जिल्ह्याला जिल्हाधिकारी म्हणून मिळाल्या.

    वर्धा (Wardha). प्रेरणा देशभ्रतार यांची वर्ध्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज राज्यात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. 2010 बॅचच्या त्या आयएएस अधिकारी आहे. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार 2019 ला 12 फेब्रुवारीला वर्ध्याला रुजू झाले होते. हे विशेष.अद्याप त्यांच्या बदलीचा आदेश आला नाही.विदर्भातील कन्या वर्धा जिल्ह्याला जिल्हाधिकारी म्हणून मिळाल्या.

    प्रेरणा हिम्मतराव देशभ्रतार या मूळच्या अमरावती जिल्ह्यातील आहे. त्यांचे वडीलांनी पोलीस विभागात सेवा केली. दररोज वडिलांच्या कामकाजाचा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला. आपल्याला सर्वसामान्यांसाठी सेवा करायची आहे या प्रेरणेने युपीएससीची परीक्षा दिली. परीक्षा उत्तीर्ण सुद्धा केली. यात त्यांना आय आर एस आई आर एस आय आर एस चे पद मिळाले. त्यामुळे त्यांना फरीदाबादला त्यांना जावे लागले. यावर समाधान न मानता त्यांनी पुन्हा युपीएससीची परीक्षा देत मराठी 2010 मध्ये देशभरात 113 वा क्रमांक पटकावला.
    देशभ्रतार या भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) २०१० च्याबॅचच्या अधिकारी आहेत. पांढरकवडा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यानंतर, जालना आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून त्यांनी काम केले. दोन्ही ठिकाणी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी त्यांनी विविध विभागांत धडक मोहिमा घेतल्या.

    देशभ्रतार यांनी इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर काही वर्षे पुण्यातील एका खासगी कंपनीत काम केले आहे. लोहगाव येथील विमानतळावर कस्टम अधिकारी म्हणूनही त्या कार्यरत होत्या. याच दरम्यान त्यांनी आयएएस पूर्ण केले. राज्याच्या विविध भागांत काम केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांना पुण्यात काम करण्याची संधी मिळाली . महानगरपालिकेत 500 कोटी रुपये पाणीपुरवठ्याचे वाचवले. बोगस कर्मचाऱ्यांच्या भरतीवर नियंत्रण आणले. पुण्यामध्येच सामाजिक न्याय विभागात आणि यशदा येथे उपमहाव्यवस्थापक पदावर काम केले.2019 मध्ये त्यांची बदली बीड येथे जिल्हाधिकारी पदावर झाली. परंतु दोन महिने झाले तरी त्यांना रुजू करता आले नाही. बीड येथील राजकारण त्यांच्या नियुक्तीला आड आले. पुन्हा पुण्यामध्येच अपंग कल्याण आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आज अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यात वर्ध्याच्या जिल्हाधिकारी म्हणून त्या काही दिवसात सुरू होणार आहे.