जिल्हा लवकरच कोरोनामुक्त! वर्धेत शनिवारी फक्त एका बाधिताची भर

गेल्या काही महिन्यात कोरोनाने थैमान घातल्यामुळे सर्वांचेच दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. त्याचा परिणाम नागरिकांत कोरोनाची भीती पसरली होती. मात्र, कोविडची दुसरी लाट ओसरत असून शनिवारी एकच बाधित आढळला. त्यामुळे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा आहे.

  वर्धा (Wardha).  गेल्या काही महिन्यात कोरोनाने थैमान घातल्यामुळे सर्वांचेच दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. त्याचा परिणाम नागरिकांत कोरोनाची भीती पसरली होती. मात्र, कोविडची दुसरी लाट ओसरत असून शनिवारी एकच बाधित आढळला. त्यामुळे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा आहे.

  जिल्ह्यात 10 जुलै रोजी हाती आलेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार गेल्या 24 तासात 668 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात कारंजा तालुक्यात एकच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यात एकही रुग्ण कोरोनाबाधित होणार नाही, यासाठी नागरिकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. आज आयसोलेशनमध्ये असलेले एकूण 55 रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने 417242 एवढे आहेत. त्यापैकी निगेटिव्ह अहवाल 364335 आहेत.

  दुसरी लाट ओसरत असल्यामुळे नागिरक विनामास्क रस्त्यावर वावरताना दिसत आहेत. मात्र, तज्ज्ञांनी तिस-या लाटेचा इशारा दिल्यामुळे सर्वांना कोविड नियमांचे पालन करत खबरादारी घेणे गरेजेचे आहे. शहरातील रस्त्यावर, विविध दुकांनामध्ये विनामास्क फिरणा-यांची संख्याही वाढत चालली आहे. यावर प्रशासनाने अंकुश लावण्याची गरज आहे.

  सहा रुग्ण कोरोनामुक्त
  जिल्ह्यात शनिवारी 6 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 49283 वर पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 47923 कोरोनामुक्त झाले आहेत.

  आज एकही मृत्यू नाही
  जिल्ह्यातील कोरोना मृत्यूचा आकडा एका दिवसाला 40 च्या जवळ पोहोचला होता. त्यावेळी स्मशानातही प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक तास वेटींगवर राहावे लागले, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, दुसरी लाट ओसरल्याने मृत्यूचा आकडाही कमी होत गेला. शनिवारी हाती आलेल्या अहवालात एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे वर्धेकरांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे.

  ३८ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह
  मागील दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजारांपेक्षा अधिक झाली होती. मात्र, लाट ओसरल्यामुळे आता ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 38 वर आली आहे.