दहा तारखेपर्यंत rt-pcr टेस्ट करा, अन्यथा दुकाने बंद; उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सूचना

वर्धा शहरातील व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे आदेशाला हरताळ फासत सर्वच दुकाने सुरू ठेवली आहे. पंचवीस दिवस व्यापार बंद करून जगायचे कसे प्रश्न व्यापाऱ्यांनी प्रशासनाला विचारला आहे. परंतु प्रशासनाने सर्व दुकाने बंद करण्याच्या सूचना व्यवसायिकांना दिल्या आहे.

  वर्धा (Wardha). शहरातील व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे आदेशाला हरताळ फासत सर्वच दुकाने सुरू ठेवली आहे. पंचवीस दिवस व्यापार बंद करून जगायचे कसे प्रश्न व्यापाऱ्यांनी प्रशासनाला विचारला आहे. परंतु प्रशासनाने सर्व दुकाने बंद करण्याच्या सूचना व्यवसायिकांना दिल्या आहे. शिवाय जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या व्यवसायिकांना दहा तारखेपर्यंत rt-pcr टेस्ट करावी लागणार आहे. अन्यथा त्यांची दुकाने बंद केल्या जातील.

  राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने काल सायंकाळी उशिरा आदेश काढला. मिनी लॉकडाऊन मध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूना दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आहे. बाकी इतर सर्व दुकाने बंद करण्याच्या सूचना आहेत.

  फक्त यांनाच परवानगी
  किराणा glossary, दूध, चिकन, मटन व अंडी,भाजीपाला, रेस्टॉरंट (फक्त पार्सल सुविधा), कृषी संबंधित सर्व दुकाने, पेट्रोल पंप सुरू राहील. याशिवाय इतर सर्व दुकाने बंद असेल. सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना शनिवार व रविवार लॉकडाऊन असेल.

  rt-pcr आणि लसीकरण अनिवार्य
  जीवनाच्या वस्तूच्या दुकानदारांना दहा तारखेपर्यंत rt-pcr करावी लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. शिवाय 45 वर्षाच्या वर असणाऱ्या प्रत्येक दुकानदाराला लसीकरण करावे लागेल.
  —- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा