नाचणगावच्या ग्रामीण रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य; कचरा इतरत्र विखुरलेला

येथील ग्रामीण रूग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कोरोना नियंत्रणाकरिता स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती करण्यात येत आहे; परंतु रुग्णालयालगतच कचरा इतरत्र विखुरल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नाचणगाव (Nachangaon).  येथील ग्रामीण रूग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कोरोना नियंत्रणाकरिता स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती करण्यात येत आहे; परंतु रुग्णालयालगतच कचरा इतरत्र विखुरल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोरोना नियंत्रणाकरिता शासन, प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. परंतू रुग्णालयासमोरच कचरा साचला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिक करीत आहे. नियमित कचा-याची उचल करुन परिसर स्वच्छ ठेवावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.

कचराकुंडी रुग्णालयालगतच
ग्रामपंचायततर्फे कचराकुंडी रुग्णालयालगत लावण्यात आली. ग्रामपंचायतर्फे तीन ते चार दिवसानंतर कच-याची उचल करण्यात येते. तसेच रुग्णालयातील कर्मचारीही परिसराची स्वच्छता करतात . नागरिक कचरा कुंडीत आणून टाकतात. कचरा कुंडी भरुन असल्याने नागरिकांना आणलेला कचरा इतरत्र विखुरला आहे.

यावर रूग्णालयात जावून प्रतिक्रीया विचारली असता कळले की ग्रामपंचायत तीन-चार दिवसांत लहरीपणे कचरा साफ करते.रूग्णालया परिसरा बाहेर सुध्दा आमचे कर्मचारी सफाई करतात;पण परिसरातील नागरिक कचराकुंडी तेथे असल्याने कचरा आणून टाकतात. — डॉ.राजश्री गिरीपूंजे ,ग्रामीण रुग्णालय नाचणगाव

सफाई कामगारांची कमतरता
कच-याची उचल करण्याबाबत ग्रामपंचायत सदस्याला विचारणा केली असता ग्रामपंचायत सदस्य म्हणाले की, मोठया गावासाठी सफाई कामगारांची कमतरता असल्याने गैरसोय होत आहे.
— अमर जनबंधू ,ग्रामपंचायत सदस्य, नाचणगाव.