जखमी शेतकरी चंद्रभान कौराशे
जखमी शेतकरी चंद्रभान कौराशे

येरला (Yerala): वानरांने हल्ला केल्याने सालगडी इसम जखमी झाला. ही घटना 13 ऑक्टोंबरला वर्धा जिल्ह्यातील कोल्ही (खेकडी) गावातील शेतात घडली. चंद्रभान कौराशे असे जखमी सालगडयाचे नाव आहे.

येरला (Yerala): वानरांने हल्ला केल्याने सालगडी इसम जखमी झाला. ही घटना 13 ऑक्टोंबरला वर्धा जिल्ह्यातील कोल्ही (खेकडी) गावातील शेतात घडली. चंद्रभान कौराशे असे जखमी सालगडयाचे नाव आहे.

जखमी चंद्रभान कौराशे हे प्रशांत चौधरी यांच्याकडे सालगडी म्हणून कामाला होता. 13 ऑक्टोंबरला ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. शेतात वानर सर्वत्र नुकसान करताना दिसले. हाती आलेले पीक हे जंगली श्वापद नुकसान करेल या उद्देश्याने चंद्रभान यांनी वानरास हकालण्यास सुरुवात केली. पण, त्याला न जुमानता वानराने चंद्रभानवर प्रतिहल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने चंद्रभान यांनी प्रतिकार केला; पण अचानक चार ते पाच वानर आल्याने त्याचा नाईलाज झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाला. असेच हल्ले जर होत असेल तर शेती करायची कशी? हा प्रश्न शेतक-यांना पडला आहे. याकडे लोकप्रतिनिधी व वन विभागाने लक्ष देत बंदोबस्त करावा. अन्यथा आम्हालाच मारण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.