बिबटयाच्या हल्ल्यातून बचावला शेतकरी; धनोडी, वडगावात बिबटयाची दहशत

आर्वी (Arvi) : शेतात काम करीत असलेल्या शेतक-यावर झुडपात लपून बसलेल्या बिबटयाने हल्ला केला. ही घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील धनोडी शिवारात रविवारी दुपारी घडली. यामुळे धनोडी, वडगावसह परिसरातील गावात बिबटयाची दहशत निर्माण झाली आहे.

वडगाव येथील संजय कावळे शेतात कापूस वेचण्याचे काम सुरू आहे. यामुळे दादाराव मेश्राम हे कापूस वेचण्यासाठी गेले होते. काम करीत असतांना त्यांचेवर बिबटयाने अचानक हल्ला केला. त्यांनी आरडा ओरड केल्याने शेजारील शेतातील शेतकरी व मजुर घटनास्थळी धावत आले. यामुळे बिबटया पळून गेला. घटना उघडकीस येताच खळबळ उडाली. शेतकरी अमोल मेश्राम, संजय कावळे, गजानन मारबते, काशीनाथ मारबते, दादाराव मेश्राम यांनी वन विभागाला सूचना दिली. हल्ल्यानंतर वन विभागाची चमू घटनास्थळी पोहोचली; परंतु तोपर्यत बिबटया दूर निघुन गेला होता.

बिबटयाने दोन दिवसांपूर्वी बापूराव शिंदे यांची एक बकरी व गजानन सोनोने यांच्या एका बकरीची शिकार केली होती. रविवारी घडलेल्या घटनेमुळे धनोडी व आजुबाजुच्या गावातील शेतक-यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यामुळे वनविभागाने बिबटयाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.