कपाशीवरील बोंडअळीने शेतकरी त्रस्त ; कृषी विभागाकडून पाहणी

देवळी (Deoli): कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याने तालुक्यातील अंदोरी येथील शेतक- याचे लाखोचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने या नुकसानग्रस्त शेतक-याच्या शेत पिकाची पहाणी केली असता कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतक-याला शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी होत आहे.

  • शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा

देवळी (Deoli): कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याने तालुक्यातील अंदोरी येथील शेतक- याचे लाखोचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने या नुकसानग्रस्त शेतक-याच्या शेत पिकाची पहाणी केली असता कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतक-याला शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी होत आहे.

अंदोरी येथील शेतकरी सुरेश दयणे यांची अंदोरी शेत शिवरात सर्व्हे नं. 461 ,1.34 हेक्टर जमीन आहे. यावर्षी शेतक-याने महिको व धनदेव जातीचे प्रभात कंपनीचे 115सुपर कॉटन कपाशी बियाण्याची लागवड केली. निंदण, डवरण, फवारणीवर मोठा खर्च केला. शेतातील पीकही बहरले; परंतु निसर्गाचा प्रकोप होऊन बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याने हाती आलेले पीक मातीमोल झाले. शेतीशिवाय त्याच्याकडे इतर उत्पन्नाचे साधन नसल्याने या अल्पभूधारक शेतक-यावर मोठे संकट कोसळले आहे. याबाबतची तक्रार कृषी विभागाकडे करण्यात आली होती.

कृषी र्विभागातर्फे एस.डी.गुट्टे व जी.एस.वंजारी, एस.एल.बुधवंत यांनी शेताची पहाणी केली. कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात शिरकाव पहाता या शेतक-याला मदतीकरिता अहवाल पुढील कार्यवाहीपर्यंत पाठवू नये असे सांगितले. विशेष म्हणजे बोंडअळी येणार नाही अशा जाहिराती करुन कंपन्या बियाणे विक्री करीत असतात. मात्र कपाशीचे क्षेत्र या बोंडअळीला बळी पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.