शेतकरी भाजीपाल्यांची देणार होम डिलिवरी; प्रभागनिहाय निश्चित क्षेत्रात करता येईल विक्री

वर्धा जिल्ह्यात लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे (strict restrictions) फळासह भाजीपाल्यांची दुकानेही (fruit and vegetable shops) पूर्णपणे बंद आहेत. या काळात शेतक-यांनी (farmers) उत्पादित केलेल्या भाजीपाल्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकरी बांधवांना प्रभागनिहाय होम डिलवरी (home delivery) देण्याची मुभा देण्यात आली आहे.

    वर्धा (Wardha). जिल्ह्यात लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे (strict restrictions) फळासह भाजीपाल्यांची दुकानेही (fruit and vegetable shops) पूर्णपणे बंद आहेत. या काळात शेतक-यांनी (farmers) उत्पादित केलेल्या भाजीपाल्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकरी बांधवांना प्रभागनिहाय होम डिलवरी (home delivery) देण्याची मुभा देण्यात आली आहे.

    कृषी विभागाकडे जिल्ह्यातील 125 शेतक-यांनी नोंदणी केलेली असून त्यांना निश्चित करून दिलेल्या प्रभागातच फळे व भाजीपाल्यांची विक्री करता येणार आहे. सदर शेतक-यांना पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. वर्धा शहरातील विविध प्रभाग वाटून दिले आहेत. वर्ध्यात शेतक-यांना फळे, भाजीपाला विक्री करावयाची असल्यास कुणाल बुलकुंडे या कर्मचा-याशी संपर्क साधावयाचा आहे. शहरात एक लाख लोकसंख्येसाठी शेतकरी नियुक्त केले आहेत. तर देवळी व पुलगाव शहरासाठी निरंजन वर्हाडे यांच्याशी परिसरातील शेतक-यांनी संपर्क साधता येईल.

    सर्व भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना वर्धा शहर व ग्रामीण भागात प्रभागनिहाय भाजीपाला व फळांची विक्री करता येईल. याबाबत शेतक-यांनी कृषी विभागाकडे संपर्क साधून नोंदणी केल्यास त्यांना ओळखपत्र देण्यात येत आहे. त्यानंतर कोणत्याही पेट्रोलपंपावर इंधन उपलब्ध होईल. कृषी विभागाकडे बुधवारपर्यंत 125 शेतक-यांनी नोंदणी केली आहे. जास्तीत जास्त शतक-यांनी कृषी विभागाकडे नोंदणी करावी, असे आवाहन आत्मा प्रकल्प संचालक विद्या मानकर यांनी केले आहे.