पॉज मशिनद्वारे खतविक्री बंधनकारक; नऊ भरारी पथक ठेवणार नियंत्रण

केंद्र सरकारच्या आदेशानुसार (According to the order of the Central Government) खरीप हंगामामध्ये (during the kharif season) कृषी केंद्र चालकांनी (agricultural centers) पॉज मशिनद्वारेच खताची विक्री करणे बंधनकारक आहे. शेतक-यांना बी-बियाण्यांचे पक्के बिल (paying the fixed seed bill to the farmers) देण्यास टाळाटाळ करणा-या विक्रेत्यांवर जिल्ह्यातील नऊ भरारी पथकांचे नियंत्रण असणार आहे.

    वर्धा (Wardha).  केंद्र सरकारच्या आदेशानुसार (According to the order of the Central Government) खरीप हंगामामध्ये (during the kharif season) कृषी केंद्र चालकांनी (agricultural centers) पॉज मशिनद्वारेच खताची विक्री करणे बंधनकारक आहे. शेतक-यांना बी-बियाण्यांचे पक्के बिल (paying the fixed seed bill to the farmers) देण्यास टाळाटाळ करणा-या विक्रेत्यांवर जिल्ह्यातील नऊ भरारी पथकांचे नियंत्रण असणार आहे.

    खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व सरपंचांची 1 जून रोजी ऑनलाईन मिटिंग घेऊन त्यांना सोयाबीन उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रिया, बीबीएफ व टोकण पद्धतीने पेरणी, बांधावर खत बियाणे पुरवठा, पॉज मशिनद्वारे खत विक्री, जुना खत साठा जुन्या दराने विक्री करण्यासाठी माहिती देण्यात आली. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात बियाणे व खताची मागणी असते. त्यासाठी कृषी विभागाच्या वतीने नियोजन करून तशी मागणीही शासनाकडे केली आहे.

    पण अनेकवेळा मागणीप्रमाणे खत, बियाणांची उपलब्धता होत नसल्याने तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. याचाच फायदा घेत अनेक कृषी विक्रेत्यांकडून निविष्ठांची जादा दराने विक्री केली जाते. या कालावधीत शेतकरी वर्गाची आर्थिक लूट होणार नाही, यासाठी कृषी विभागाच्या वतीने भरारी पथकाकडून नियंत्रण ठेवले जाणार आहे.

    नऊ भरारी पथक ठेवणार लक्ष
    जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे व निविष्ठांचा काळाबाजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यासाठी जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक असे एकूण नऊ भरारी पथके स्थापन केली आहेत. काळा बाजाराला आळा घालण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून साठेबाजी करणा-यांवर भरारी पथकांची करडी नजर असणार आहे.

    नियंत्रण कक्षाशी साधा संपर्क
    खते, बियाणे व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार, वितरक व विक्रेते यांना येणा-या अडचणींचे निराकरण करण्यासाठी कृषिमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर नियंत्रण कक्षाशी सकाळी 10 ते सांयकाळी 6 या वेळेत दूरध्वनी क्रमांक 07152-232449 / 07152-242789 तसेच टोल फ्री क्रमांक 18002334000 या क्रमांकावर संपर्क करता येईल. तक्रारदारांनी कृषी निविष्ठांच्या अडचणीबाबत तक्रारी नोंदवितांना शक्यतो आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व तक्रारीचा तपशील देण्यात यावा.

    ३९ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध
    खरीप हंगामासाठी 95 हजार क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली असून आजपर्यंत जिल्ह्यासाठी 39 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. तर खताचे 85 हजार 290 मेट्रिक टन आवंटन मंजूर झाले असून 42 मे. टन खत उपलब्ध झाला आहे.

    उगवण क्षमता तपासून पेरणी करा
    खरीप हंगामात शेतक-यांकडून पेरणी करण्यापूर्वी सोयाबीनची उगवणक्षमता तपासून पेरणी करावी. तसेच बीबीएस पद्धतीने लागवड करावी. बियाणे कमी असल्यास टोकन पद्धतीने लावावे. खरेदी केल्यानंतर त्याची पावती घ्यावी, शक्य झाल्यास 200 ग्राम बियाणेही जपून ठेवावे. खते-बियाण्यासंदर्भात कोणतीही अडचण असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. विक्रेत्यांकडून अधिक दराने खत-बियाणांची विक्री केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
    —- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी