वर्धेत कोरोना मृत्यूचे पाचवे शतक; जिल्ह्यात सोमवारी पाच जणांना बळी

वर्धा जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोना मृत्यूचा आकडाही वाढू लागला आहे. जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा पाचशेपेक्षा अधिक झाला आहे. सोमवारी कोविडने पाच जणांचा बळी घेतला.

    वर्धा (Wardha).  जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोना मृत्यूचा आकडाही वाढू लागला आहे. जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा पाचशेपेक्षा अधिक झाला आहे. सोमवारी कोविडने पाच जणांचा बळी घेतला. त्यात (वर्धा-पुरुष वय 47, 40, हिंगणघाट- पुरुष वय 42, महिला वय 80, आर्वी-पुरुष वय 51) यांचा समावेश आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 502 मृत्यू झाले आहेत. त्यात सर्वात जास्त वर्धा तालुक्यातील कोविड रुग्णांचा समावेश आहे.

    मागील 24 तासात 1848 चाचण्या करण्यात आल्या. त्यात 256 पॉझिटिव्ह निघाले. तर आयसोलेशनमध्ये असलेले एकूण 3076 व्यक्ती आहेत. आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने 2 लाख 14 हजार 225 असून अहवाल प्राप्त 2 लाख 14 हजार 205 आहेत. त्यात निगेटिव्ह 1 लाख 89 हजार 558 असून प्रलंबित अहवाल 20 आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 22 हजार 993 वर पोहोचली आहे. सोमवारी 285 कोरोनामुक्त झाले. तर एकूण 19 हजार 676 कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 3032 रुग्ण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत.

    आणखी २५६ बाधितांची भर
    जिल्ह्यात सोमवारी हाती आलेल्या कोरोना चाचणी अहवालात आणखी 256 बाधितांची भर पडली आहे. त्यात वर्धा 162 (पुरुष 102 महिला 60), हिंगणघाट 23 (पुरुष 11 महिला 12), देवळी 45 (पुरुष 31 महिला 14), आर्वी 19 (पुरुष 12 महिला 7), आष्टी 1 (पुरुष 1 महिला 0), कारंजा 0 (पुरुष 0 महिला 0), समुद्रपूर 6 (पुरुष 5 महिला 1) यांचा समावेश आहे. त्यात 162 पुरुष तर 94 महिला आहेत.