प्रतिकात्मक  फोटो
प्रतिकात्मक फोटो

वर्धा (Wardha). चार दिवसांपूर्वी शांतीनगर बायपासवर झालेल्या अपघातात आईसह नवजात बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला.तर शनिवारी रात्री जखमी भुषणचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वर्धा (Wardha). चार दिवसांपूर्वी शांतीनगर बायपासवर झालेल्या अपघातात आईसह नवजात बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला.तर शनिवारी रात्री जखमी भुषणचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

माहितीनुसार मांडवा येथील भूषण सावध (35), पत्नी शितल (25) हे चार महिन्याच्या बाळासह दुचाकीने गावी जात होते. नागपूरवरुन यवतमाळ कडे जात असलेल्या ट्रव्हल्सने दिलेल्या धडकेत हे तिघे गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघातात शीतल जागीच गतप्राण झाली. तर बाळाचा रुग्णालयात मृत्यू झाला.

गंभीररीत्या जखमी झालेल्या भूषणवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरु होते. चार दिवसांपासुन भुषण सावंगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. अखेर शनिवारी रात्री 12 वाजता भुषणणे अखेरचा श्वास घेतला. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याने मांडवा गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.